RGPPL चे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांच्या हस्ते उद्घाटन
गुहागर, ता. 19 : क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, संचालित जिल्हा क्रिडा परिषद रत्नागिरी, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित स्क्वॅश रॅकेट स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. या स्पर्धा रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनी, बालभारती पब्लिक स्कूल, अंजनवेल, यांच्या सहकार्यातून स्क्वॅश रॅकेट असोसिएशन ऑफ रत्नागिरी आणि जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धा नेताजी सुभाष स्पोर्टस कॉम्प्लेक्स कृष्ण विहार आरजीपीपीएल येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी जिल्हास्तरीय शालेय स्क्वॅश रॅकेट स्पर्धेच्या “स्क्वॅश कोट”चे उद्घाटन आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांच्या हस्ते करण्यात आले. District Level School Squash Racket Competition
यावेळी आरजीपीपीएल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांनी सर्व स्पर्धकांशी सुसंवाद साधला. तसेच राज्य, राष्ट्रीय खेळाडूप्रमाणे तुम्ही ही खेळामध्ये विशेष प्राविण्य प्राप्त करा. विद्यार्थ्यांना प्रश्नावलीच्या माध्यमातून खेळाचा इतिहास, खेळाचे महत्व व सांघिक खेळ व त्यातून होणारे संघटन याविषयी माहीती दिली. तसेच या स्पर्धांसाठी व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व पुढील होणाऱ्या विविध स्पर्धाना सहकार्य करू असे आश्वासन दिले. District Level School Squash Racket Competition
यावेळी २२ वर्षानंतर पुणे बालेवाडी क्रीडा संकुल येथे होणाच्या मिनी ऑलम्पिकमध्ये सहभागी झालेल्या जिल्हयातील सर्व खेळाडूंना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आले. तसेच प्रशिक्षक मनिष काणेकर, भरत कररा, प्रविणकुमार आवळे यांचाही सत्कार करण्यात आला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून मनिष काणेकर, सोमनाथ सुरवसे, प्रविणकुमार आवळे, भरत कररा, सेजल कदम, हर्षाली बागुल, निलेश नलावडे यांनी काम पाहिले. आप स्क्वॅश मध्ये जिल्हयातून २०० खेळाडू सहभागी झाले होते. District Level School Squash Racket Competition
यावेळी आरजीपीपीएल कंपनीचे जनरल मॅनेजर संजय अग्रवाल, बालभारती पब्लिक स्कूलचे प्राचार्य सुरजित चॅटर्जी, अजय शर्मा ,स्क्वॅश असो. जिल्हा अध्यक्ष विजय उतेकर, वरिष्ट प्रबंधक आशिष पांडे, प्रबंधक अमीत शर्मा, बालभारती पब्लिक स्कुलचे स्पोर्टटिचर नविंदर लखनपाल, स्क्वॉश रॅकेट असो. जिल्हा सचिव भरत व्यंकटराव कररा, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर राव कररा, शशांक घडशी, संजय सुर्वे आदी उपस्थित होते. District Level School Squash Racket Competition