• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
8 November 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्वा. सावरकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा

by Guhagar News
May 15, 2023
in Ratnagiri
40 0
0
District Level Rangoli Competition
78
SHARES
222
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 15 : महाराष्ट्र शासन पर्यटन संचालनालय आणि विवेक व्यासपीठातर्फे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताहाअंतर्गत ही स्पर्धा २२ मे रोजी होणार आहे. सकाळी १० वाजता ऐतिहासिक पतितपावन मंदिरात रांगोळी रेखाटण्यास सुरवात होणार असून सायंकाळी ६ वाजता या रंगावली प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा खुल्या गटासाठी होणार आहे. District Level Rangoli Competition

या स्पर्धेमध्ये स्वा. सावरकर यांच्या जीवन प्रसंगांवर रांगोळी काढायची आहे. रांगोळीचा आकार ४ फूट बाय ३ फूट आहे. प्रथम क्रमांकास रू. ५०००, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, द्वितीय रू. ३०००, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, तृतीय रू. २०००, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ दोन बक्षीसे प्रत्येकी रू. १०००, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. District Level Rangoli Competition

रांगोळी काढण्यासाठी २२ मे रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वेळ दिला जाणार आहे. रांगोळी चित्राचे स्केच करून आणायचे आहे, कृष्णधवल प्रिंटचा वापर करू नये. स्पर्धकांनी आपली नावे १८ मे पर्यंत सौ. अनघा निकम- मगदूम, मंगेश मोभारकर यांच्याकडे द्यावीत. स्पर्धकांच्या दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार असून बक्षीस वितरण २८ मे रोजी पतितपावन मंदिरात होणार आहे. जिल्ह्यातील रांगोळीकारांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालय, विवेक व्यासपीठ, पतितपावन मंदिर, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्टतर्फे केले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी सौ. अनघा निकम- मगदूम मो. 9422371907, मंगेश मोभारकर मो. 8766432864 यांच्याशी संपर्क साधावा. District Level Rangoli Competition

Tags: District Level Rangoli CompetitionGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share31SendTweet20
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.