रत्नागिरी, ता. 06 : शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था आणि शिक्षण विभाग (योजना) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय उल्लास मेळाव्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत व महसूल, गृह, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते शनिवार 8 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरी मिस्त्री हायस्कूल येथे होणार आहे. District level meeting of education department


या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, खासदार नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रसाद लाड, आमदार भास्कर जाधव, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम यांच्यासह जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, कोकण विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती राहणार आहे. District level meeting of education department