श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ काटवली प्रथम
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील श्री देव वेळणेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवानिमित्त श्री सत्यनारायण प्रासादिक भजन मंडळ वेळणेश्वर येथे जिल्हास्तरीय निमंत्रित संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ काटवली यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक विश्वकर्मा संगीत भजन मंडळ, शिरगाव ता. चिपळूण तर तृतीय क्रमांक विश्वकर्मा भजन मंडळ आगरनरळ यांनी प्राप्त केला. District level Hymn competition at Velaneshwar
या स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट गायक निखिल ओक, उत्कृष्ट कोरस स्वरसाधना संगीत भजन मंडळ, उत्कृष्ट पखवाज अभिजित देशमुख, उत्कृष्ट तबला अनिकेत नवरत, उत्कृष्ठ हार्मोनियम रमेश प्रभुळकर यांची निवड करण्यात आली. त्यांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.महाशिवरात्री निमित्त भजन स्पर्धा असल्याने प्रत्येक भजनामध्ये श्री देव शंकरावरील गीत गायले गेले. भजनामध्ये प्रार्थना, अभंग, गजर, संगीत अभंग, गवळण, अभंग आणि गजर घेण्यात आले. District level Hymn competition at Velaneshwar
या भजन स्पर्धेमध्ये जय हनुमान प्रासादिक संगीत भजन मंडळ चिपळुण ओझरवाडी, ता. चिपळुण, श्री विश्वकर्मा संगीत भजन मंडळ चिपळूण शिरगाव बुवा -अनिकेत चव्हाण, श्री माऊली प्रासादिक भजन मंडळ सैतवडे, ता. रत्नागिरी, बुवा – सुनील मिरजूळकर, विश्वकर्मा प्रासादिक भजन भजन मंडळ, आगरनरळ, ता. रत्नागिरी, लक्ष्मी नारायण प्रासादिक भजन मंडळ हेदवी, ता. गुहागर बुवा – निखिल ओक, स्वर साधन संगीत भजन मंडळ मळण, ता. गुहागर, बुवा – संदीप नाटूस्कर, श्री गजानन प्रासादिक भजन मंडळ काटवली, ता. संगमेश्वर बुवा – अभय नांदलकर आदी सहभागी झाले होते. District level Hymn competition at Velaneshwar