भंडारी भवन येथे दि 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी
गुहागर, ता. 07 : रत्नागिरी जिल्हा हौशी जुदो संघटनेच्या वतीने पहिली रत्नागिरी जिल्हा जुदो चॅपियनशिप लिग स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दि 9 व 10 फेब्रुवारी 2023 रोजी गुहागर येथील कै इंदिरा वासुदेव शेटे सभागृह, भंडारी भवन येथे या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत जिल्हा भरातून 14 संघ सहभागी होणार असून एकूण 412 खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. दि 9 फेब्रुवारी रोजी स. 11 वा मान्यवरांच्या उपस्थितीत स्पधेचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती जिल्हा अध्यक्ष निलेश गोयथळे यांनी दिली. District Judo Championship League 2023

ज्युदो हा वैयक्तिक खेळ असला तरी खेळाडूंमध्ये संघ भावना निर्माण व्हावी यासाठी खेळला जातो. जूदो स्पर्धकांचा एक विशिष्ट पोषाख असतो. साधारणतः हा पोषाख सैल असतो. त्यास गुंड्या किंवा खिसे नसतात. इजा कमीत कमी व्हावी म्हणून खालचे पाय उघडे ठेवले जातात. स्पर्धक जाकीट नीट बसावे म्हणून पट्टा वापरतात. पट्ट्याचा रंग खेळाडूचा दर्जा दाखविणारा असतो. निःशस्त्र स्वसंरक्षणपद्धतीच्या तत्त्वांवर आधारलेला कुस्तीसारखा खेळ. जूदो खेळात अनेक डावपेच असतात. त्यांतील प्रत्येक हालचाल ही विशिष्ट अर्थाने व उद्देशाने केलेली असते. जूदोच्या प्रगत शिक्षणात अंगघात करण्याच्या त्याचप्रमाणे रुधिराभिसरण रोखण्याच्या व दम कोंडण्याच्या दृष्टीने शारीर व शारीरक्रियाविज्ञानाचा अभ्यास अंतर्भूत असतो. बेशुद्ध व्यक्तीस शुद्धीवर आणण्याची उपाययोजनाही शिकविली जाते. District Judo Championship League 2023

