• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
4 February 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दापोलीत तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन

by Guhagar News
January 18, 2024
in Ratnagiri
68 1
0
District Cycle Meet at Dapoli
134
SHARES
383
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनोज भाटवडेकर ठरले सायकल गौरव पुरस्काराचे मानकरी

रत्नागिरी, ता. 18 : तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन दापोली सायकलिंग क्लबतर्फे १० ते १४ जानेवारी २०२४ या कालावधीत दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेज सभागृह येथे उत्साहात संपन्न झाले. यामध्ये देश विदेशातील अनेक दिग्गज नावाजलेले सायकलप्रेमी सहभागी झाले होते. प्रमुख पाहुणे एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण आणि मान्यवर यांनी संमेलनाचे उदघाटन केले. अनेकांना लांब पल्ल्याचे सायकलिंग करण्यासाठी प्रवृत्त करणारे, त्यांना प्रोत्साहन देणारे मनोज भाटवडेकर यांना या वर्षीचा सायकल गौरव पुरस्कार देण्यात आला. District Cycle Meet at Dapoli

District Cycle Meet at Dapoli

पाच दिवस या संमेलनात सादरीकरण सत्रे, मुलाखती, चर्चासत्र, अनुभव कथन, सायकल दिंडी, सायकल चित्रपट महोत्सव इत्यादी अनेक सायकल विषयक भरगच्च माहितीपूर्ण कार्यक्रम झाले. रशिया येथील अलेस्की बर्नोव्ह (वय ६०), लोहपुरुष डॉ तेजानंद गणपत्ये, मिलिंद खानविलकर, रुपेश तेली कुडाळ(डेक्कन क्लीफहँगर), संजय सावंत (नर्मदा परिक्रमा), यश म्हसकर (उमलिंगला पास), प्रेमसागर मेस्त्री महाड, सुबोध गांगुर्डे (३६५ दिवस ३७० किल्ले), पूजा बुधवले (१२ ज्योतिर्लिंग यात्रा), डॉ रामेश्वर भगत, गोपाल साबे पाटील (GRM), सागर बोडके नाशिक(अंधत्वावर मात), मुंबई परिसरातील धनंजय मदन, सायकल मेयर सुधिर चकोले, प्रज्ञा म्हात्रे (आम्ही सायकल प्रेमी), कुणाल सुतार, पुरनसिंह मेहरा, संजय खाडे, डॉ सुनील पुणतांबेकर(डोंबिवली सायकल मित्र संमेलन), निलेश कुष्टे इत्यादी इत्यादी अनेक नावाजलेले सायकलस्वार यांचे अनुभवकथन, सादरीकरण सत्रे, प्रेरणादायी व विचार करायला लावणारे होते. २०२३ वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार करण्यात आला. LRM SR रॉकेटमॅन अहमदअली शेख, अमित कवितके, डॉ मनिषा वाघमारे, प्रशांत दाभोळकर, रोहन पवार, श्रीनिवास गोखले, विनायक पावसकर, अथर्व शेंडे, ओमकार फडके, महेश सावंत, डॉ अश्विनी गणपत्ये, इशान धनश्री गोखले, नभा श्रावणी सिद्धेश बांदिवडेकर, प्रशांत पालवणकर, संजय मांजरे इत्यादी अनेकांना गौरवण्यात आले. District Cycle Meet at Dapoli

District Cycle Meet at Dapoli

या सायकल संमेलनाचे नियोजन करण्यासाठी विनायक वैद्य, अंबरीश गुरव, सुरज शेठ, डॉ संदेश जगदाळे, डॉ रामदास महाजन, राजेंद्र नाचरे, शैलेश पेठे, प्रसाद देवस्थळी, धिरज पाटकर, अमित पेडणेकर आणि खेड, रत्नागिरी, चिपळूण, दापोली सायकलिंग क्लबचे सदस्य इत्यादी अनेकांचे सहकार्य लाभले. या सायकल संमेलनात अनेक दिग्गज सायकलस्वारांची भेट, ओळख, मार्गदर्शन यामुळे सर्वजण खुश झाले. आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करुन तंदुरुस्त आरोग्य जगण्याचा निश्चय सर्वांनी केला आहे. District Cycle Meet at Dapoli

District Cycle Meet at Dapoli
District Cycle Meet at Dapoli

Tags: District Cycle Meet at DapoliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.