‘ऑफ्रोह’ चा सामाजिक उपक्रम
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील गिमवी येथील आदिवासी कातकरी वाडीत दिवाळीनिमित्त ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन (ऑफ्रोह)च्यावतीने कुटुंबांना फराळ वाटप करण्यात आले. Distribution of snacks to tribal families
गिमवी येथे एकच आदिवासी कातकरी वाडी आहे. याठिकाणी जनमन योजनेची ५ घरकुले वाडीत मंजूर आहेत. ही घरकुल पाहिल्यानंतर ‘ऑफ्रोह’चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी वाडीतले संतोष निकम यांना हाऑफ्रोहचा छोटा उपक्रम सांगितला. या उपक्रमाला ऑफ्रोहच्या सर्वांनीच सहमती दिली. दीपावलीच्या पूर्वसंध्येलाच ऑफ्रोहचे सभासद आकाश दांडगे, स्मिता कुंभारे, गजेंद्र पौनीकर, पौनीकर यांची कन्या शिवाली पौनीकर यांनी ह्या आदिवासी वाडीत फराळ वाटप केला. यामध्ये योगायोग म्हणजे पौनीकर यांची कन्या शिवालीचा वाढदिवस होता. हा वाढदिवस या आदिवासी वाडीमध्येच साजरा करण्यात आला. यावेळी ‘वाटप केलेला फराळही जानवळे येथील श्री. गावदेवी उत्पादक गटाकडून विकत घेण्यात आला होता. Distribution of snacks to tribal families