• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 February 2026, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फराळ वाटप

by Guhagar News
October 22, 2022
in Ratnagiri
23 0
0
Distribution of snacks to hostel students
45
SHARES
128
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुख्याध्यापक विनोद नारकर यांच्याकडून ७५ विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्ताने फराळ

रत्नागिरी, ता. 22 : येथील परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक विनोद नारकर यांनी झाडगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यार्थी वसतीगृहातील ७५ विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्ताने फराळ वाटप केले. सलग दहा वर्षे श्री. नारकर वसतीगृहात फराळ वाटपाचा कार्यक्रम राबवत आहेत. Distribution of snacks to hostel students

यावेळी श्री. नारकर यांना आंतरराज्य आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. फराळ वाटपाच्या उपक्रमाचे हे दहावे वर्ष आहे. तसेच आवश्यक सुविधांसाठी आर्थिक सहाय्य करत आले आहेत. त्यांनी आपल्या भाषणात आपण दोन वर्षे वसतीगृहात राहून शिक्षण घेतल्याचे सांगितले. वसतिगृहात राहत असताना सतत घरची आठवण येत राहते. त्यामुळे काही काळ जीवन प्रवास खडतर वाटतो. पण येथेच माणूस स्वावलंबी आणि आत्मनिर्भर होतो. आपल्याला यानिमित्ताने काही काळ तुमच्यासोबत राहण्याचा आनंद मिळतो. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करा, अवांतर पुस्तके व वर्तमानपत्रांचे वाचन करा आणि सर्व महान लोकांची पुस्तके या लहान वयातच वाचा. याकरिता विलंब करू नका. आपणही आपल्या आयुष्यात समाजासाठी कार्य करत रहाल अशी अपेक्षा व्यक्त केली. वसतिगृहाचे चेअरमन, मुख्याध्यापक श्री. कांबळे व समाज कल्याण अधिकाऱ्यांनी श्री. नारकर यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. Distribution of snacks to hostel students

Distribution of snacks to hostel students

या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते चैतन्य केळकर, अॅड. अमित शिरगावकर, छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक आकाश कांबळे, समाज कल्याणचे विस्तार अधिकारी विश्वनाथ बोडखे, अधीक्षक गजानन बागडी उपस्थित होते. Distribution of snacks to hostel students

Tags: Distribution of snacks to hostel studentsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share18SendTweet11
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.