जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांचे आवाहन
रत्नागिरी, ता. 18 : शिधा जिन्नस संच छपाई करण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर न करता आनंदाचा शिधा वाटप कोऱ्या पिशव्यांमध्ये किंवा पिशवीशिवाय वितरण करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहितेचा कोणत्याही परिस्थितीत भंग होणार नाही याची दक्षता घेवून उर्वरित लाभार्थी यांनी लाभ घ्यावा व जिल्ह्याचे सर्व संच वितरण व्हावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यांनी केले आहे. Distribution of rations of happiness
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय लाभार्थी यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याकरिता दोन लाख बावन्न हजार आठशे श्याऐंशी शिधाजिन्नस प्राप्त झाले होते. या आनंदाच्या शिध्यामध्ये प्रतिसंचात खाद्यतेल 1 लि., साखर 1 किलो व चणाडाळ अर्धा किलो, रवा अर्धा किलो, मैदा अर्धा किलो, पोहा अर्धा किलो याचा समावेश होता. जिल्ह्यात वितरणाकरिता पिशव्या उशीरा प्राप्त झाल्या होत्या. लोकसभा निवडणूक 2024 ची आदर्श आचारसंहिता दि. 16 मार्च पासून जाहीर झाल्यामुळे आनंदाचा शिधा वितरणाला शासनाकडून स्थगिती देण्यात आली होती. Distribution of rations of happiness
आचार संहिता लागण्यापूर्वी जिल्ह्याचे वितरण 98.45 टक्के पूर्ण होते. मंडणगड तालुक्यात 100 टक्के वितरण पूर्ण झाले होते. इतर उर्वरित तालुक्यांमध्ये 3915 इतके संच शिल्लक होते. दापोली – 141, खेड-781, गुहागर-93, चिपळूण-65, संगमेश्वर-224, रत्नागिरी- 1529, लांजा-105 व राजापूर 977 याप्रमाणे संच अद्याप शिल्लक आहेत. तरी शासन निर्णयानुसार आनंदाचा शिधा संचापैकी जे संच शिल्लक आहेत. त्या संदर्भात शिधाजिन्नस संच छपाई करण्यात आलेल्या पिशव्यांचा वापर न करता कोऱ्या पिशव्यांमध्ये किंवा पिशवीशिवाय वितरण करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. आदर्श आचार संहितेचा कोणत्याही परिस्थितीत भंग होणार नाही याची दक्षता घेवून उर्वरित लाभार्थी यांनी लाभ घ्यावा व जिल्ह्याचे सर्व संच वितरण करावे, असेही म्हटले आहे. Distribution of rations of happiness