• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर अपंग  पुनर्वसन  संस्थेकडून शैक्षणिक साहित्य वाटप

by Manoj Bavdhankar
June 13, 2023
in Guhagar
71 1
0
Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute
140
SHARES
400
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांगाच्या मुलांना तसेच  गरीब  होतकरू विद्यार्थ्यांसाठी

गुहागर, ता. 13 : गुहागर  तालुका अपंग  पुनर्वसन  संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांगाच्या मुलांना तसेच  गरीब  होतकरू विद्यार्थ्यांना  मोफत  शैक्षणिक  साहित्याचे  वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम संस्थेचे  कार्यालय वरवेली येथे संपन्न झाला. तालुक्यातून त्याला उत्तम  प्रतिसाद मिळाला. Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute

Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute

या कार्यक्रमाची  सुरुवात महाराष्ट्राचे  आराध्य दैवत  छत्रपती शिवाजी  महाराज  यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  करण्यात आली. या कार्यक्रमासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून जीवनश्री  प्रतिष्ठानचे  अध्यक्ष मा. श्री.संतोषजी वरंडे, अभिषेक इंटरप्राइजेसचे मालक व जेष्ठ उद्योजक मा. श्री. पंढरीजी किर्वे, चिपळूण येथील  जेष्ठ कीर्तनकार व सेवानिवृत्त केंद्र प्रमुख मा. सौ. अंजली  साने मॅडम, गुहागरचे  पोलिस उपनिरीक्षक मा. श्री.पवनजी  कांबळे, पापा संजीवनी ट्रस्ट मुंबईचे  अध्यक्ष मा. श्री. पंडित, गुहागर हायस्कूलचे प्राचार्य मा. सुधाकर  कांबळे सर, संस्थेचे  जेष्ठ सल्लगार  मा. श्री. विनायक ओक  सर, संस्थेचे  अध्यक्ष श्री. उदय  रावणंग सर, उपाध्यक्ष श्री. प्रकाश अनगूडे सर, सरचीटणीस श्री. सुनील रांजाणे, खजिनदार  श्री. सुनील मुकनाक, वेळंब गावचे पोलिस पाटील श्री. स्वप्नील बारगोड़े आदी मान्यवर व विद्यार्थी तसेच पालक  मोठ्या संख्यने उपस्थित होते. Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute

Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute

प्रास्ताविका मध्ये  संस्थेचे  अध्यक्ष श्री.उदय  रावणंग सर  यांनी या कार्यक्रमाचे  महत्त्व पटवून  दिले. संस्था गेली 21 वर्षे  अविरतपणे  हा उपक्रम राबवित आहे. संस्थेला शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत  नाही. अशा  परिस्थितीतही संस्था लोक सहभातुन विविध  उपक्रम राबवित आहे. तसेच संस्थेने गेल्या 21 वर्षात  केलेल्या कार्यांची व भविष्यातील योजनांची  माहिती सांगितली. तसेच संस्थेचे सर्व सुविधांनी युक्त दिव्यांग संकुल बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देणगीदार दात्यांची गरज असल्याचे बोलुन दाखविले.

Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute

संस्थेला श्री. समीर  नार्वेकर साहेब डायरेक्टर टी. डब्ल.  जे. असोसीएट श्रृंगारतळी, श्री. संतोष वरडे जीवनश्री प्रतिष्ठान गुहागर, श्री. योगेंद्रजी विचारे वरवेली, श्री. हेमचंद्रजी मोरे साहेब, शासकीय  स्टेम्प वेंडर गुहागर, पापा संजीवनी  ट्रस्ट मुंबई, सौ. अंजली  साने मॅडम, चिपळूण, श्री. शरद  तांबे चिपळूण या दात्यांनी लागणारे शैक्षणिक  साहित्य पुरविले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते एकुण 83 विद्यार्थ्यांना शैक्षणिक  साहित्याचे वाटप  करण्यात आले. अजुनही ज्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. अशा विद्यार्थ्यांनी संस्थेशी संपर्क साधुन आपले साहित्य घ्यावे. Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute

उपस्थिती मान्यवरांनी आपल्या मनोगतातुन विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्यामध्ये श्री संतोष वरंडे सर यांनी संस्थेच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच सर्व विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस उप निरिक्षक श्री. पवन कांबळे साहेब यांनी संस्था गेली 21 वर्षे सातत्याने राबवित असलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. संस्थेचे कार्य व सभासदांचा उत्साह बघुन मला काम करण्याची उर्जा मिळाली असे सांगितले. तसेच अभिषेक एंटरप्राइजेसचे मालक श्री. पंढरीनाथ किर्वे यांनी विद्यार्थ्यांना जिवनात आलेल्या अडचणींवर कशा प्रकारे मात करावी, हे आपल्या अनुभवातून सांगितले. तसेच माजी केंद्र प्रमुख व किर्तनकार सौ. अंजली साने मॅडम यांनी उपस्थित दिव्यांग सभासद व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. शेवटी अध्यक्षिय भाषणात संस्थेचे जेष्ठ सल्लागार श्री. विनायक ओक गुरुजींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व दिलेल्या साहित्याचा योग्य पद्धतीने वापर करावा व ज्या दात्यांनी हे साहित्य दिले आहे त्यांची व संस्थेची जाणीव ठेवावी असे सांगितले. Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute

Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुहागर हायस्कूल व ज्यु.कॉलेजचे प्राचार्य श्री. सुधाकर कांबळे सर यांनी केले. तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. श्री. प्रकाश अनगुडे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक श्री. प्रविण मोहिते, श्री. अनिल जोशी, सौ. सानिका रांजाणे, संगम रावणंग, श्रवण रावणंग, रविंद्र मालप, संतोष घुमे यांनी विशेष प्रयत्न केले. Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute

Distribution of materials from the Disabled Rehabilitation Institute
Tags: Distribution of materials from the Disabled Rehabilitation InstituteGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share56SendTweet35
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.