कुडली माटलवाडी शाळा नं.३ व परिसरातील शाळा
संदेश कदम, आबलोली
गुहागर ता. 18 : मुंबई आयकर विभाग येथे सेवा करीत असलेले मासू गावचे सुपुत्र श्री. राजेश रामचंद्र भोजने यांचे चिरंजीव ओम राजेश भोजने यांच्या तर्फे कै.रत्नमाला रामचंद्र भोजने यांच्या स्मरणार्थ गुहागर तालुक्यातील कुडली माटलवाडी शाळा नं.३ येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. Distribution of educational materials by Om Bhojane


प्रतिवर्षी भोजने परिवारातर्फे परिसरातील शाळांना मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत असते. मासू गावातील विद्यार्थ्यांनाही त्यांच्यातर्फे दरवर्षी वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येत. याबाबत मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी ओम राजेश भोजने व परिवाराचे आभार मानले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल शाळेच्या वतीने व गावाच्या वतीने धन्यवाद दिले. Distribution of educational materials by Om Bhojane
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश वनये यांनी भोजने परिवाराचे आभार मानले व अशा दानशूर व्यक्ती गावागावात निर्माण व्हायला पाहिजे अशी भावना व्यक्त केली. यावेळी माजी प्राचार्य गुरूवर्य प्रभाकर होवाळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सुकन्या शाळेच्या पदवीधर शिक्षिका सौ. प्रमोदिनी गायकवाड यांच्यातर्फे शाळेला परिपाठासाठी मोठी चटई व पुस्तकांची भेट देण्यात आली. त्यांचेही यावेळी आभार व्यक्त करण्यात आले. Distribution of educational materials by Om Bhojane


या शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेश वनये, उपाध्यक्षा संजीवनी थोरसे, माजी उपसरपंच पांडुरंग थोरसे, किसन थोरसे,संजय ठोंबरे शांताराम थोरसे, काशिनाथ डिगणकर, अंगणवाडी सेविका अर्चना जोशी, अवनी माटल, आशा सेविका उर्मिला ठोंबरे, पदवीधर शिक्षिका प्रमोदिनी गायकवाड, उपशिक्षक संदेश सावंत, गणेश वायचाळ यासह बहुसंख्येने पालक उपस्थित होते. Distribution of educational materials by Om Bhojane