गुहागर, ता. 21 : गुहागरचे माजी सभापती स्व. सदानंद आरेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त वरचापाट येथे आरेकर प्रतिष्ठान गुहागर संस्थेच्या महिला विभाग प्रमुख सौ. स्वाती कचरेकर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी वरचापाट येथील अंगणवाडी सेविका सौ. शर्मिला कचरेकर, सौ. प्रीती भोसले, स्वरांगी शेटे, विशाखा तोडणकर, रूपाली तोडणकर आदी उपस्थित होते. Distribution of educational materials