गुहागर, ता. 07 : गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावणारी नामांकित सेवाभावी संस्था सत्यम फाउंडेशन जत यांच्यातर्फे आदर्श केंद्र शाळा शीर नंबर १ शाळेत गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच करण्यात आले. Distribution of educational material by Satyam Foundation
खरे ढेरे कॉलेज गुहागरचे प्राध्यापक व या संस्थेचे प्रतिनिधी प्राध्यापक संतोष जाधव, निळकंठ भालेराव, अनिल हिरगोंड, गोविंद सानप यांच्या उपस्थितीत सदर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्राध्यापक गोविंद सानप यांनी संस्थेचा उद्देश व कार्य याची थोडक्यात माहिती दिली. तसेच ज्या विद्यार्थ्यांना ही मदत देण्यात आलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी या बदल्यात जास्तीत जास्त अभ्यास करून चांगले यश संपादन करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले. Distribution of educational material by Satyam Foundation
मुख्याध्यापक सुहास गायकवाड यांनी संस्थेला धन्यवाद देत असताना तालुक्यातील हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच लोक शिक्षणासाठी मदत करत आहेत. यामध्ये आपण प्राध्यापक वर्ग आहात याचा आम्हाला निश्चित अभिमान वाटतो असे मत व्यक्त केले. आपण ज्या उद्देशाने या विद्यार्थ्यांसाठी ही मदत केली आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळा म्हणून आम्हाला जे जे करता येईल ते ते आम्ही करू, असे आश्वासनही संस्थेला दिले. यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ प्रमोदिनी गायकवाड व सौ मृणाली रेडेकर उपस्थित होत्या. शेवटी शिक्षक श्री नितीन आमराळे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. Distribution of educational material by Satyam Foundation