• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट

by Guhagar News
June 17, 2023
in Guhagar
156 2
0
Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team

Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team

307
SHARES
878
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

निर्मला इलेव्हन संघ; शिक्षक दाम्पत्याचा केला सत्कार

गुहागर, ता. 17 : तालुक्यातील तवसाळ तांबडवाडीतील निर्मला इलेव्हन संघाने बाबरवाडी व तांबडवाडीतील दोन जिल्हा परिषद शाळा व एका अंगणवाडीतील 108 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट दिली. या उपक्रमामध्ये गावातील काही नागरिक आणि एका संस्थेने सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे वेळी खेळाडूंनी तांबडवाडी शाळेतून बदली झालेल्या बुरटे दाम्पत्याचा सत्कार केला. Distribution of educational material by Nirmala XI team

Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team
Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team

तवसाळ तांबडवाडीमधील निर्मला इलेव्हन संघाने जि.प.आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडी व जि.प.शाळा तवसाळ बाबरवाडी मधील अंगणवाडी(१८ मुले-मुली) इयत्ता १ली ते ७वी (५० मुले- मुली) तसेच दोन्ही वाड्यांमधील इयत्ता ८ वी ते १४ वी मध्ये शिकणाऱ्या ४० मुले – मुलींना प्रत्येकी १ डझन वह्या भेट दिल्या. याच कार्यक्रमात नरेश नाचरे, किरण धोपट, माजी सरपंच संदीप जोशी, विलास नाचरे यांनी दोन्ही शाळांमधील मुलांना कंपासपेटी, पेन्सिल बॉक्सची भेट दिली. तसेच संतोष अबगुल प्रतिष्ठानकडून विद्यार्थ्यांना १००  पॅड भेट म्हणून दिली. Distribution of educational material by Nirmala XI team

Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team
Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team

तवसाळ तांबडवाडीमधील बुरटे सर व बुरटे मॅडम यांची अन्य शाळेमध्ये बदली झाली आहे. निर्मला इलेव्हन संघातील अनेक खेळाडुंना बुरटे दाम्पत्यांने शिकवले आहे. त्यामुळे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमामध्ये खेळाडुंनी बुरटे दाम्पत्याच सत्कार केला. त्याच्या पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. Distribution of educational material by Nirmala XI team

Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team
Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team

या कार्यक्रमाला  केंद्र प्रमुख लोहकरे सर, गायकवाड सर, न्यू इंग्लिश स्कुल पडवेच्या माजी मुख्याध्यापिका कोळवणकर मॅडम, नंदकुमार बेंद्रे, विजय मोहिते, भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, हेदवी हायस्कुलमधील शिक्षक कदम सर, नरवणचे दत्ताराम जोगले,  पडवेतील सामाजिक कार्यकर्ते सुभाष कोळवणकर, माजी सरपंच सौ. नम्रता निवाते, संदीप जोशी, ग्रामपंचायत सदस्य रमेश कुरटे, माजी ग्रामपंचायत सदस्या  सौ. वत्सला पारदले, शंकर येद्रे, विजय नाचरे, महादेव कुरटे, कृष्णा वाघे, प्रकाश कुलये,  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. वैष्णवी निवाते, दीपक निवाते, राजेश नाचरे,  काशिनाथ हुमणे,  राजेश वाघे, महादेव वाघे, सखाराम वाघे आदी मान्यवरांसह तांबडवाडी व बाबरवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते. Distribution of educational material by Nirmala XI team

Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team
Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team

निर्मला इलेव्हन संघाच्या खेळाडूंनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले होते. आलेल्या पाहुण्यांनी निर्मला इलेव्हन संघाचे कौतुक करून पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा दिल्या. Distribution of educational material by Nirmala XI team

Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team
Distribution_of_educational_material_by_Nirmala_XI_team
Tags: Distribution of educational material by Nirmala XI teamGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share123SendTweet77
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.