ज्येष्ठ नेते चंद्रकांत धोंडू बाईत यांच्या वाढदिवसानिमित्त
गुहागर, ता. 23 : लोकशिक्षण मंडळ आबलोलीचे कार्याध्यक्ष, गुहागर तालुक्याचे माजी सभापती, ज्येष्ठ नेते चंद्रकांत धोंडू बाईत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांच्या मार्गदर्शनाखाली गुहागर तालुक्यातील ४२ प्राथमिक शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आले. Distribution of book in primary schools

युवा नेते शुभम बाईत यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. चंद्रकांत बाईत यांनी केलेले शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य आणि त्यांचे या क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन तोच वारसा पुढे नेण्याचे काम आपणास करावयाचे आहे असे त्यांनी सांगितले. Distribution of book in primary schools

तालुकाप्रमुख बाईत यांचे राजकारणाबरोबरच लोकाभिमुख कार्यात मोठे योगदान राहिले आहे. पाणी टंचाईग्रस्त गावात वनराई बंधारे असो वा कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची मदत, आर्थिक मदत, वैद्यकीय सेवा या सर्व कार्यात बाईत यांचा पुढाकार राहिला आहे. आबलोली आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी बाईत यांच्या रूपाने प्रसिद्धी पासून अलिप्त असलेल्या खऱ्याखुऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आहे. तशी अपेक्षाहि नागरिक व्यक्त करत आहे. Distribution of book in primary schools

या कार्यक्रमाच्यावेळी शुभम बाईत, तालुका सचिव विलास गुरव, प्रा. अमोल पवार, रजत बाईत, शुभम साळवी, राकेश साळवी, शंकर पागडे, आशिष भोसले, संदीप मोहिते आदींसह शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. विलास गुरव यांनी सर्वांचे आभार मानले. Distribution of book in primary schools
