आबलोली, ता. 21 : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत काजुर्ली यांच्या वतीने १५ वा वित्त आयोग साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गावातील दुर अंतरावरील वाड्यांतून माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थिनींना सायकलचे मोफत वाटप करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थीनींना सायकल भेट देऊन ग्रामपंचायतच्या वतीने मुलींना प्रोत्साहन देण्यात आले. Distribution of bicycles in Kajurli
गावातील डॉ. नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय काजुर्ली या विद्यालयातील श्रुती तावडे, आदीती धांगडे, दिक्षा मोहिते, वैष्णवी वेलोंडे, सानिका मते या विद्यार्थीनिंना सायकल वाटप करण्यात आल्या. यावेळी मुख्याध्यापक दिनेश पवार उपस्थितीत होते. सरपंच रुक्मिणी सुवरे, उपसरपंच सुधाकर गोणबरे, सदस्य अजित मोहिते, मेघना मोहिते, सखी सावंत, स्नेहल गुरव, ग्रामसेवक संजय गोरे, ज्योती धांगडे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. Distribution of bicycles in Kajurli
दूर अंतरावरून शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनींना शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये. तसेच त्यांची पायपीट थांबून वेळ वाचावा, यासाठी सायकल वाटप करण्यात आले. असे सरपंच रुक्मिणी सुवरे, उपसरपंच सुधाकर गोणबरे यांनी यावेळी सांगितले. सर्व उपस्थितांचे ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसेवक संजय गोरे यांनी आभार मानले. Distribution of bicycles in Kajurli