भाजप तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे; कामकाजात सुधारणा करण्याच्या सुचना
गुहागर, ता. 30 : नियमितपणे चालू असणारी मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे जनता त्रस्त असताना महावितरण शाखा कार्यालय आबलोलीचे कनिष्ठ अभियंता श्री. निकम हे नॉट रिजेबल असल्यामुळे या कार्यालयाच्या भौगोलिक क्षेत्रातील गावातून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. शाखा अभियंत्यांना महावितरण विभागाकडून जनतेच्या सेवेकरता, संपर्काकरता, समन्वयाकरता एक मोबाईल नंबर दिलेला आहे. मात्र, निकम आबलोली कार्यालयात हजर झाल्यापासून या महावितरणच्या मोबाईल नंबरवर कोणी फोन केल्यास कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही किंवा फोन उचलत नाही. यामुळे वीज ग्राहकांकडून प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. Dissatisfaction among consumers regarding Mahadistribution
गेले १५ दिवस मुसळधार होणारी पर्जन्यवृष्टी, काही ठिकाणी वादळांमुळे झाडे पडुन विजेचे पोल पडून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असताना या कनिष्ठ अभियंत्याच्या मनमानी कारभारामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास फार विलंब लागत आहे. हे कनिष्ठ अभियंता आणि प्रत्येक सजेसाठी नेमले गेलेले कर्मचारी हे त्या त्या सजेवर राहत नसल्यामुळे अडचणी अधिक वाढत असल्याचे वीज ग्राहकांमधून बोलले जात आहे. या पावसाळी हंगामात 33 केव्ही, 11 केव्ही या प्रमुख वीजवाहिन्यांबरोबर गावात वीजपुरवठा करणाऱ्या वाहिन्या सुद्धा वारंवार खंडित होत आहेत. कर्मचारी वर्ग अपुरा पडत असल्याने वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत आहे. Dissatisfaction among consumers regarding Mahadistribution
या सर्व गोष्टी लक्षात घेता भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे, तालुका सरचिटणीस सचिन ओक, गुहागर तालुका भाजपा ओबीसी सेलचे अध्यक्ष साईनाथ कळझुणकर यांनी महावितरणचे गुहागर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. सुद यांची भेट घेऊन महावितरण आबलोली शाखेचे कनिष्ठ अभियंता निकम यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये अत्यावश्यक बदल करावा असे सुचित केले. त्याचबरोबर त्यांना वीज ग्राहकांच्या समस्या सोडवण्याकरता, संपर्क – समन्वया करता महावितरण विभागाने दिलेला मोबाईल नंबर कायमस्वरूपी चालू ठेवून त्यावर येणारे वीज ग्राहकांचे कॉल त्यांनी स्वीकारून त्यांना नम्रपणे प्रतिसाद द्यावा, अशा सूचनाही भाजप तालुका अध्यक्ष सुर्वे यांनी केल्या. Dissatisfaction among consumers regarding Mahadistribution
आबलोली महावितरण शाखा कार्यालयात असणारे कर्मचारी हा वीजपुरवठा सुरळीत करण्यास अपुरे पडत आहेत. त्यामुळे उर्वरित पावसाळी हंगामासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसिकवर अधिकचे कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता निकम यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या सजेमध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रमध्ये निवासी राहावे, अशा मागणीचे निवेदन उप कार्यकारी अभियंता, उपविभाग गुहागर यांना देण्यात आले आहे. Dissatisfaction among consumers regarding Mahadistribution