• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धुपप्रतिबंधक बंधाऱ्याने गुहागर समुद्रकिनाऱ्याचे विद्रुपीकरण

by Ganesh Dhanawade
May 19, 2025
in Guhagar
425 4
0
Disfigurement of the beach by the dam
834
SHARES
2.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तक्रारींमुळे समुद्रचौपाटीवरील बंधाऱ्याचे काम रखडले

गुहागर, ता. 19 : गुहागर समुद्रकिनाऱ्यावर धुपप्रतिबंधक बंधाऱ्यांचे काम सध्या सुरू आहे. कोटयावधी रूपयाच्या या बंधाऱ्याच्या कामाची बंधारा नक्की कोणत्या दिशेपासून कोणत्या दिशेपर्यंत पूर्ण करायचा हे कागदावर लिहीले असले तरी प्रत्यक्षत काम करताना यावर घेतल्या गेलेल्या तक्रारींमुळे सध्या गुहागर समुद्रचौपाटीवरील बंधाऱ्याचे काम रखडले आहे. Disfigurement of the beach by the dam

गुहागर शहराला तब्बल ६ किलोमिटरची समुद्रचौपाटी लाभली आहे. सध्या या चौपाटीवर सीआरझेडमुळे अनेक कामे पाडण्यात आली. तर सध्या सुरू असलेल्या कामांवर घेण्यात येत असलेल्या आक्षेपामुळे बंधाऱ्या आडून अर्थकारणचे राजकारण सुरू असल्याचा सुर उमटत आहेत. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दोन तर असगोली याठिकाणी असे तीन बंधाऱ्याचे काम सुरू आहे. गुहागर पोलिस परेड मैदानामागील असलेला ३८० मिटरचा बंधारा प्रत्यक्षात बजेटमुळे २८६ मिटरवर आला आहे. यामुळे बंधाऱ्याच्या निर्धारीत कामाव्यतिरिक्त काम करण्याची मानसिकता संबधीत ठेकेदाराची नाही. दुसरा बंधारा हा खालचापाट ते शिवाजीचौक आणि खालचापाट ते बाजारपेठ असा विभागला गेला आहे. Disfigurement of the beach by the dam

Disfigurement of the beach by the dam

ठेकेदाराला सदर बंधारा बांधताना काळया दगडाची वाहतुक करणार कशी हा प्रश्न होता. मात्र तरीही लहान वाहनाने पुर्वीच्या नक्षत्रवन येथून मार्ग काढत दगडाची वाहतुक करण्यात आली. सदर बंधारा हा नक्षत्रवन येथून होणे आवश्यक होता. मात्र तसे न करता खाडीचे पाणी आतमध्ये येणारा मार्ग बंद होत असल्याने यावर काहींनी तक्रारी केल्या आहेत. परिणामी गेले महिनाभर येथील बंधाऱ्याचे काम बंद अवस्थेत आहे. Disfigurement of the beach by the dam

गुहागर समुद्रकिनाऱ्यावरील कोटयावधी रूपयाच्या बंधाऱ्याचे काम घेण्यामध्ये चुरस निर्माण झाली होती. प्रस्तापीत राजकारण्यांचा ठेका ठरलेला. अशामध्ये सर्वबाजुने सेटींग लावून कामांचे वाटप झाले. असगोली येथील बंधाऱ्याचेही कामाचे नाव वेगळे व प्रत्यक्षातील काम वेगळे असा प्रकार समोर येत आहे. याचबरोबर पुर्वीचा संरक्षक बंधारा काढून त्याचे काळे दगड वापरून बंधाऱ्याचे काम सुरू करण्यात आले. असगोली ते पाचमाड असे प्रत्यक्षात कामाचे नाव व तशाप्रकारे कामाचे भूमिपूजनही झाले. परंतु प्रत्यक्षात काम झाले ते असगोली मारूतीमंदिर या दिशेने. यामुळे यावरही अनेकांनी आक्षेप नोंदवीला आहे. Disfigurement of the beach by the dam

गुहागर शहर बाजारपेठेसमोरील एकाबाजुला २८७ मिटरचा बंधारा तर दुसऱ्या बाजुला १०५ मिटरचे दोन बंधारे ज्याचे बजेट प्रत्येकी एक कोटीपर्यंत असून हा बंधारा सध्या अर्धवट स्थितीत आहे. शहर बाजापरपेठेतून वाहतुक करताना तारेवरील कसरत करावी लागत आहे. अशामध्ये २८७ मिटरच्या बंधाऱ्याचे काम पुर्ण होत आले आहे. परंतु उर्वरीत १०५ मिटरचे दोन बंधारे मात्र सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुर्वीची सन २०१६ मधील कामाची मंजूरीमधील खालचापाट ते शिवाजीचौक हे कार्यक्षेत्र नक्की कोणते पकडणार तर खालचापाट ते बाजारपेठ हे क्षेत्र नक्की कोठून ते कुठपर्यंत असा सवाल निर्माण होत आहे. Disfigurement of the beach by the dam

परिणामी बंधाऱ्याचे काम रखडले आहे. रखडलेल्या या बंधाऱ्या कामामुळे समुद्रचौपाटीवर काळया दगडाच्या मांडणीमुळे चौपाटीचे विद्रुपीकरण झाल्याचे दिसून येत आहे. शहराच्या मुख्य नाक्यापासून समुद्रचौपाटीवर जाणाऱ्या मार्गावरील पेव्हर ब्लॉकचे नुकसान झाल्याने काहींनी तक्रार केली आहे. यामुळे शहरातील चौपाटीवरील अर्धवट बंधाऱ्यामुळे चौपाटीचे विद्रुपीकरण झाल्याचे पहावयास मिळत आहे. Disfigurement of the beach by the dam

Tags: Disfigurement of the beach by the damGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share334SendTweet209
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.