• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
15 February 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खेड दापोली सिमेवर ‘रामगड’ किल्ल्याचा शोध

by Ganesh Dhanawade
March 27, 2023
in Ratnagiri
294 3
0
Discovery of Ramgarh Fort
578
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दुर्ग अभ्यासक आणि पुरातत्त्व अभ्यासक यांचे यशस्वी संशोधन

गुहागर, ता. 27 : दापोली आणि खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या पालगड सिमेवर ‘रामगड’ नावाच्या एका किल्ल्याचा शोध घेण्यात आला आहे. हा शोध दुर्ग अभ्यासक संदिप परांजपे आणि डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन जोशी यांनी अभ्यास आणि मेहनतीच्या बळावर शोध घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यामुळे कालौघात गडप झालेला इतिहास या नव्या संशोधनाने उजेडात येणार आहे. Discovery of Ramgarh Fort

दापोली तालुक्यातील पालगड या गावास पूर्वेस दापोली-खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर समुद्रसपाटीपासून अंदाजे ३९० मीटर (१२८० फूट) उंचीवर असलेला छोटेखानी किल्ला वसला आहे. मात्र, या किल्ल्याबाबत लोकांना अद्याप माहिती नसल्याची बाब पुढे आली आहे. या किल्ल्याचा अभ्यास आणि अथक प्रयत्नाने संदिप परांजपे आणि डॉ. सचिन जोशी यांनी या ऐतिहासिक ठेव्याचा शोध लावला, असून ‘रामगड’, असे या किल्ल्याचे नाव आहे. दुर्ग अभ्यासक आणि पुरातत्त्व अभ्यासक यांनी शोधलेल्या रामगड किल्ल्यामुळे ऐतिहासिक वारशाच्या इतिहासाला पुन्हा एकदा चालना मिळणार आहे. Discovery of Ramgarh Fort

रामगड हा पालगडचा जोडकिल्ला असून आजवर या किल्ल्याची स्थाननिश्चिती झालेली नव्हती. महाराष्ट्रात रामगड नावाचे दोन किल्ले आहेत. यातील पहिला रामगड हा किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात मोडतो, तर दुसरा रामगड हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोडतो. या किल्ल्याची बांधणी कोणत्या काळात झाली याविषयी आजतागायत कोणालाच माहिती नाही, मात्र पालगडबरोबरच हा किल्लादेखील बांधला गेला असावा. दोन्ही किल्ल्यांच्या बांधणीत अनेक समान गोष्टी दिसतात. या किल्ल्यांचे उल्लेख १७२८ पासून मिळतात. या किल्ल्याचे उल्लेख असलेली दोन- तीन कागदपत्रे उपलब्ध असून यातील पहिली नोंद १७२८ मधील यादीत आहे. ही यादी ऐतिहासिक संग्रहांमध्ये प्रसिद्ध झालेली असून त्यात सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात असलेल्या किल्ल्यांची यादी दिलेली आहे. या यादीत रामगड किल्ल्याचा उल्लेख पालगडबरोबर झालेला असून तो रामदुर्ग असा येतो. Discovery of Ramgarh Fort

पुढील दोन्ही पत्रे पेशवे दप्तरातील असून ती अनुक्रमे १७४५ आणि १८१८ मधील आहेत. यातील पहिले पत्र कोणी कोणास पाठवले याचा उल्लेख प्रस्तुत खंडातील प्रसिद्ध लेखात नाही, मात्र रत्नागिरीमधील रामगड सिद्दीच्या ताब्यात असावा आणि तो सिद्दीवरील मोहिमेत परिसरातील रसाळगडबरोबर पेशव्यांच्या ताब्यात आला असावा, असे या पत्रावरून समजते. दुसरे पत्र मार्च १८१८ मधील असून या पत्रात इंग्रजी फौजा पालगड व रामगड येथे पहाटेपासून तोफांचा मारा करत असून किल्ल्यावर लागलेली आग खूप दुरून दिसत असल्याचे म्हटले आहे. हे पत्र धोंडो विश्वनाथाने निळोपंत पुरंदर यांना पाठवले आहे, मात्र सदर पत्रावरून रामगड व पालगड हे दोन्ही किल्ले एकमेकांच्या जवळ असल्याचे दिसून येते. Discovery of Ramgarh Fort

पालगड आणि रामगड किल्ल्याच्या भोवती एकूण पाच माच्या असून रामगड माची आहे. ही रामगड माची किल्ल्याच्या पश्चिमेस असून सध्या ती राणी माची या नावाने ओळखली जाते.किल्ल्याची सॅटेलाईट इमेज बघता पालगडच्या पश्चिमेकडे एक उंचवटा असून त्यावर बांधकामाचे अवशेष दिसून येतात. आकाराने अतिशय छोट्या माथ्यावर हे बांधकाम केलेले दिसून येते. किल्ल्याच्या सर्वेक्षणात किल्ल्याचा दरवाजा त्याचे २ संरक्षक बुरुज, चहू बाजूस असलेली रुंद तटबंदी तसेच तटबंदीतील ४ बुरुज, किल्ल्याच्या आतील बाजूस एक सुटा बुरुज, अंदमासे ६-७ इमारती काही थडगी, भांड्यांचे तुकडे मिळाले असून किल्ल्याची तटबंदी व दरवाजा पूर्णपणे उध्वस्त झाले आहेत. किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पालापाचोळा आणि झाडे झुडपे वाढलेली असल्यामुळे किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था काय होती हे समजले नाही. किल्ल्यातील साफसफाई केल्यावर अजून अवशेष उघडकीस आणण्याचा प्रयत्न करू, या दुर्गावरील साफसफाईचे काम दुर्गवीर प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी केले तसेच मोडी अभ्यासक राज मेमाणे यांचीही या कामी मोडी लिपीतील कागदपत्रे पडताळ्यासाठीची मोठी मदत झाली असल्याची माहिती पुणे येथील डेक्कन महाविद्यालयाचे पुरातत्त्व अभ्यासक डॉ. सचिन विद्याधर जोशी यांच्या कडून उपलब्ध झाली आहे. Discovery of Ramgarh Fort

Tags: Discovery of Ramgarh FortGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share231SendTweet145
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.