• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 August 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्पीड पोस्ट बुकिंगवर १० टक्के विशेष सवलत

by Mayuresh Patnakar
August 25, 2026
in Maharashtra
67 1
0
Discount on Speed Post booking
131
SHARES
375
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राखीसोबत आता भेटवस्तूही; टपाल विभागाचे विशेष नियोजन

रत्नागिरी, ता. 25 : रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर दूरदेशी असलेल्या लाडक्या भावापर्यंत केवळ राखीच नव्हे, तर भेटवस्तू, कपडे, मुद्रा किंवा खास आठवणी सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी टपाल विभाग सज्ज झाला आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन टपाल विभागाने खास ‘वॉटरप्रूफ’ लिफाफे आणि ‘पार्सल पॅकेजिंग’ सुविधा उपलब्ध करून दिली असून, नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे. Discount on Speed ​​Post booking

सणासुदीच्या काळात राखी पाठवणाऱ्या बहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी टपाल विभागाने विशेष आर्थिक सवलत जाहीर केली आहे. त्यानुसार स्पीड पोस्टद्वारे राखी किंवा भेटवस्तूंचे बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना टपाल शुल्कामध्ये १० टक्के सवलत दिली जात आहे. पावसामुळे टपाल भिजून खराब होण्याची भीती असते. यावर उपाय म्हणून टपाल विभागाने आकर्षक, देखणे आणि उच्च प्रतीचे खास ‘वॉटरप्रूफ’ लिफाफे विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत. या मजबूत लिफाफ्यांमुळे राखी व सोबत पाठवलेली भेटवस्तू पूर्णपणे सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. Discount on Speed ​​Post booking

केवळ देशांतर्गतच नव्हे, तर अमेरिका, युरोप, आखाती देशांसह परदेशात स्थायिक असलेल्या भावांसाठी ‘आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट’ची (International Speed Post) स्वतंत्र व गतिमान व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. ही सुविधा जिल्ह्यातील सर्व डाकघरांमध्ये उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा किंवा रत्नागिरी टपाल विभागाच्या ८६६९९९९८६० या व्हॉटस्ॲप क्रमांकावर संपर्क साधावा. Discount on Speed ​​Post booking

Tags: Discount on Speed Post bookingGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share52SendTweet33
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.