गुहागर, ता. 27 : कोरोनाचा काळ व त्यानंतर १५ ऑगस्टची तहकूब झालेली वेळंब ग्रामपंचायतीची ग्रामसभा शाळा नं.१ च्या सभागृहात उत्साहात पार पडली. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मारुती जाधव होते. Discontinuance of widow practice in Velamb

सभेच्या सुरुवातीलाच ग्रामपंचायतीचे प्रशासक व गुहागर पं. स. चे सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. केळसकर यांनी विवेचन केले. व शासनाची आलेली परिपत्रके व विविध योजना यावर उपस्थित ग्रामस्थांना सविस्तर मार्गदर्शन केले. शासकीय योजना समजावून सांगून याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी तयार व्हावेत. व त्यासाठी ग्रामपंचायतीला सहकार्य करण्याचे आवाहन केले. फळबाग लागवड, जलसिंचन रोजगार हमी अशा योजनांचा आढावा घेऊन त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या कामी ग्रा. पं. चे लेखनिक नितीन पागडे यांनी त्यांना सहकार्य केले. Discontinuance of widow practice in Velamb
या ग्रामसभेत विधवा प्रथा बंद करणे बाबत आलेल्या शासकीय परिपत्रकावर श्री. केळसकर यांनी सखोल मार्गदर्शन केले. आजच्या आधुनिक काळात अशी प्रथा सुरु असणे ही लाजीरवाणी बाब असून तिचे निर्मूलन करण्यासाठी सर्वांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावर बोलतांना सभा अध्यक्ष मारुती जाधव यांनी ही आजच्या युगात अशा प्रथा बाळगून आपण आपल्याच महिलांवर अन्याय करत असण्याचे सांगून ही अनिष्ट प्रथा कायम स्वरूपी आपण बंद करूया, असे ग्रामस्थांना आवाहन केले. याविषयावर उपस्थित ग्रामस्थांनी ही आपले विचार मांडले व त्यानंतर सर्वानी हात वर करून या ठरावाला मंजुरी दिली. Discontinuance of widow practice in Velamb

या ग्रामसभेत वेळंब घाडेवाडी शाळा क्र. 2 येथील विद्यार्थ्यांनी १५ ऑगस्टला गुहागर पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या समूह नृत्य स्पर्धेत भाग घेऊन तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल शाळेचे विद्यार्थी व शिक्षक यांचा अध्यक्षांनी जाहिर सत्कार केला. या शाळेच्या शिक्षिका ज्योती भाटकर व मिनाक्षी पवार याचे अध्यक्ष यांनी आवर्जुन कौतुक केले. वेळंब गावचे नाव उंचावल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. हर घर तिरंगा अभियान व त्या निमिताने गाव पातळीवर स्वातंत्र्याबद्दलचे प्रेम वृद्धिंगत केल्या बद्दल श्री. केळसकर यांनी विद्यार्थी व ग्रामस्थांना धन्यवाद दिले. या ग्रामसभेला ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. त्यामधे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. Discontinuance of widow practice in Velamb
