एल अँड टी कंपनीतील प्रकार; मनसेचे सुनील हळदणकर कामगारांच्या पाठीशी
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील अंजनवेल येथील कोकण एलएनजी कंपनीचे समुद्रातील ब्रेक वॉटरचे काम करणाऱ्या एल अँड टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना कोणतीही पूर्व सूचना न देता तडफातडफी कामावरून काढून टाकण्यात आले आहे. या अन्यायाविरोधात गुहागर तालुका मनसे कामगारांच्या पाटीशी उभी राहिली आहे. Direct dismissal without prior notice
याप्रकाराबाबत कामगारांनी मनसे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर आणि उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांना दिली. त्यांनी प्रकल्पास्थळी जाऊन कामगारांचे म्हणणे ऐकून घेतले. दरम्यान कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये चर्चा चालू असून सदरील विषय सामोपचाराने सोडवून घ्यावा असे मनसेचे म्हणाणे आहे. जर कामगारांवरती अन्याय झाला तर मनसे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी आहे आणि योग्य ती कारवाई मनसे करेल असे गुहागर तालुका मनसेतर्फे सर्व कामगारांना सांगण्यात आले. Direct dismissal without prior notice
कोकण एलएनजी कंपनीतील एल अँड टी कंपनी समुद्रामध्ये ब्रेक वॉटरचे काम करत आहे. गेली तीन वर्षे ब्रेक वॉटरचे काम सुरू आहे. या कामासाठी कंपनीने स्थानिक कामगारांची नियुक्ती केली आहे. साधारणत पावसाळ्यात येथील काम बंद करण्यात येते. १ जुलै पासून बहुतांश कामगारांना ब्रेक देण्यात आला आहे. परंतु कंपनी व्यवस्थापनाकडून स्थानिक कामगारांना अर्धा पगार दिला जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. परंतु आता कंपनी व्यवस्थापनाकडून या कामगारांना कामावरून सरसकट कमी करण्यात आले आहे. भर पावसाळ्यात या सर्व कामगारांची उपासमार होणार आहे. अनेक शेकडो कामगार रस्त्यावर उतरले आहेत. या सर्व कामगारांच्या पाठीशी मनसे खंबीरपणे उभी राहणार आहे. जो पर्यंत कंपनी व्यवस्थापन कामगारांना न्याय देत नाही, तो पर्यंत मनसे कामगारांच्या न्यायहक्कासाठी लढा देत राहणार असल्याचे उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर व तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांनी सांगितले. Direct dismissal without prior notice