आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
गुहागर, ता. 17 : कीर्तनवाडी येथील कन्हैया प्ले स्कुलमध्ये बालक व पालकवर्ग यांच्या सोबत आषाढी एकादशी व गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. Dindi from Kanhaiya Play School


यानिमित्ताने कीर्तनवाडी ते साई मंदिर शिवाजी चौक गुहागर पर्यंत दिंडीचे काढण्यात आली. कन्हैया प्ले स्कुलमध्ये लहान मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी करण्यात येते. विविध उपक्रमांत मुले मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. यावेळी देखील गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीमध्ये प्ले स्कुल मधील सर्व बालगोपालांनी सहभाग घेतला होता. Dindi from Kanhaiya Play School


यावेळी कन्हैया प्ले स्कुलच्या प्राचार्य सौ. अक्षता शिंदे, शिक्षका मा.सौ.राऊत मॅडम, सौ. हलगरे मॅडम शाळाव्यवस्थापन समिती सदस्य सौ. मानसी शेटे तसेच सर्व पालकवर्ग उपस्थित होते. Dindi from Kanhaiya Play School