गुहागर, ता. 21 : तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथील सुकन्या डॉ. कु. धनश्री दिनेश साळवी एम.बी.बी.एस. (रशिया) हीने ६ फेब्रुवारी २०२४ रोजी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे तिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागरच्या वतीने शृंगारतली येथील मनसे जनसंपर्क कार्यालय येथे सत्कार करण्यात आला. Dhanashri Salvi felicitated by MNS
रशिया सारख्या प्रगत देशात एम.बी.बी.एस. शिक्षणं पुर्ण करणारी गुहागर तालुक्यातील ती एकमेव तरुणी असून नुकतीच तिने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया ही परीक्षा पास झाली आहे. तिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी डॉ. कु. धनश्री हिचे वडिल दिनेश साळवी उपस्थित होते. Dhanashri Salvi felicitated by MNS
यावेळी डॉ. धनश्री साळवी हिने मनसेच्या वतीने सत्कार केल्याने त्यांचे आभार व्यक्त केले. डॉ. कु. धनश्री दिनेश साळवी सध्या श्रृंगारतळी येथील डॉ. सचिन ओक यांच्या प्रो लाईफ हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे.एम.बी.बी.एस.चे (रशिया) येथे शिक्षण पूर्ण करून तिने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया शिक्षण पूर्ण केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच डॉ.धनश्री दिनेश साळवी यांचे वडील दिनेश साळवी यांचाही सत्कार करण्यात आला. Dhanashri Salvi felicitated by MNS
या कार्यक्रमाला जानवळे ग्रामपंचायत सदस्य वैभवी विनोद जानवळकर, रत्नागिरी उपजिल्हा अध्यक्ष गुहागर विधानसभा क्षेत्र विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर, शहर अध्यक्ष नवनाथ साखरकर, शृंगारतळी गण विभाग अध्यक्ष विश्वजीत पोतदार, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, पडवे गण उपतालुका अध्यक्ष सचिन गडदे, प्रसिद्धी माध्यम अध्यक्ष प्रीतम सुर्वे, कौंढर काळसूर शाखा अध्यक्ष सुनिल मुकनाक, चिखली उपशाखा अध्यक्ष सागर चांदिवडे, कौंढर गट अध्यक्ष किशोर बामणे, वेलदुर शाखा अध्यक्ष वैभव आंबेकर, अंजनवेल विभाग अध्यक्ष सुहास चोगले, पालशेत विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी, महाराष्ट्र सैनिक सुनील चांदिवडे, महाराष्ट्र सैनिक दीपक सुर्वे, महाराष्ट्र सैनिक श्रीधर अडूरकर आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. Dhanashri Salvi felicitated by MNS