तथागतांनी जगाला बुद्ध धम्म दिला, धम्माचे आचरण व संरक्षण करावे – प्रा.मिलिंद कडवईकर
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 31 : आज युवा पिढी वेगवेगळ्या आमिषांना बळी पडत आहे. जर तिला सावरायचे असेल तर बुद्ध धम्मातील अष्टांगिक मार्ग समजून घेण्याची खरी गरज आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांनी जगाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी वैज्ञानिक बौद्ध धम्म दिला परंतू आज तरुणवर्ग खरा धम्म सोडून कर्मकांडात अडकून पडले आहेत त्यांनी आता कर्मकांड सोडून तथागत भगवान गौतम बुद्धांनी जगाला वैज्ञानिक बौद्ध धम्म दिला आहे. या बुद्ध धम्माचे तरुणांनी वर्गाने आचरण व रक्षण करावे असे जाहीर आवाहन अक्षर मानव माध्यमिक शिक्षक विभाग राज्याध्यक्ष, प्रा.मिलिंद कडवईकर यांनी केले. Dhammachakra Pravartana Day Ceremony at Khershet


चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समिती, गावशाखा: खेरशेत, धम्मभूषण विकास संघ, खेरशेत (मुंबई) रजि. यांच्यावतीने तक्षशिला बुद्ध विहार, खेरशेत येथे ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यानिमित्त “बौद्ध धम्म आणि तरुणाई समोरील आव्हाने” या विषयी प्रा. मिलिंद कडवईकर मौलिक मार्गदर्शन केले, ते पुढे म्हणाले की, तथागतांच्या धम्मरुपी मार्गानेच जाण्यात आपले सर्वांचे कल्याण आहे. Dhammachakra Pravartana Day Ceremony at Khershet
यावेळी “डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि धम्म क्रांती” या विषयावर अॅड.अशोक निकम मार्गदर्शन करताना म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण घेतले असले तरी त्यांना जाती भेदाचा त्रास सहन करावा लागला त्यामुळे त्यांनी १९३५ सारी घोषणा केली की, मी जरी हिंदू धर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही त्यानंतर १९५६ साली बौध्द धम्माचा स्वीकार केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्विकारलेला धम्म कोणाला दडपणाखाली ठेवत नाही तो मुक्त विचार करायला शिकवतो या धम्माने जगाला सर्वात मोठी देणगी कोणती दिली असेल तर ती म्हणजे नैतीकता दिली. आजही भारतात अडीच हजार वर्षांपूर्वी तथागतांनी दिलेली नैतीकता जनमानसात टिकून आहे असे मौलिक मार्गदर्शन अॅड.अशोक निकम यांनी केले. Dhammachakra Pravartana Day Ceremony at Khershet


या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला स्थानिक संघटनेचे अध्यक्ष सुनील शंकर कदम यांच्या अधिपत्याखाली ध्वजारोहण, बुद्धपाठ व सामूहिक भोजनदानाचा कार्यक्रम शांततेने पार पडला. यावेळी धम्मविचार पीठावर मुंबई संघटनेचे अध्यक्ष अनिल काशिराम कदम, महिला मंडळाच्या अध्यक्षा शैला बालाजी कदम, सावर्डे विभागाचे अध्यक्ष काशिराम कदम गुरुजी , सामाजिक कार्यकर्ते विलास डिके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कदम सर, प्रदीप कदम गुरुजी, अनंत कदम गुरुजी यांनी केले. Dhammachakra Pravartana Day Ceremony at Khershet


संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सम्यक युवा मंचचे अध्यक्ष आकाश कदम, माजी अध्यक्ष, अँड प्रशितोष कदम, उपाध्यक्ष विजय शांताराम कदम, माजी अध्यक्ष विजय शंकर कदम, प्रताप मोहिते, राजेंद्र कदम, निखिल कदम, सुमेध कदम, नितीन कदम, अनिल शांताराम कदम, सौ .संघरक्षिता कदम, दक्षता कदम, मनाली कदम, मनीषा कदम, ज्योती कदम, छाया कदम, कासारे भाऊ, बाल जलमित्र स्वराज मोहिते, वैभव कदम, भीमदास कदम उपस्थित युवावर्ग, महिलां समवेत मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच, खेरशेत या संस्थेचे मुख्य प्रवर्तक संजयराव शांताराम कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. Dhammachakra Pravartana Day Ceremony at Khershet