श्री विश्वकर्मा नवरात्र उत्सव पांचाळवाडी येथे फॅन्सी ड्रेस स्पर्धा
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 24 : तालुक्यातील आबलोली पांचाळवाडी येथे श्री. विश्वकर्मा नवरात्र उत्सव आबलोली पांचाळवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण ३६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धा दोन गटात घेण्यात आल्या होत्या. दांडिया प्रेमिंच्या प्रचंड गर्दीत अवतरलेल्या अक्कलकोट स्वामी समर्थ वेशभूषेतील प्रदीप पांचाळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धच्या परिक्षणाचे काम वासुदेव पांचाळ, मुख्याध्यापक वाघमारे, माजी केंद्र प्रमुख रमेश जाक्कर, संदेश सावंत यांनी केले.
यावेळी अनेक कलाकारांनी विविध कला सादर केल्या. तरुणाईच्या आनंदाला पारावार उरला नाही. या स्पर्धेसाठी पंचक्रोशीतील जनता बहूसंख्येने उपस्थित होती. नवरात्र उत्सव फॅन्सी ड्रेस स्पर्धेत अनेक रूपांचे दर्शन दांडिया रसिकांना पाहण्यास मिळाले. मोठ्या गटात प्रथम क्रमांक श्री. प्रदीप बंडू पांचाळ (अक्कलकोट स्वामी समर्थ), दुसरा क्रमांक सौ. कल्याणी प्रसाद नेटके (बुरंगुडा), तिसरा क्रमांक श्री. जितेंद्र रमेश पांचाळ ( दैव कांतारा) यांनी पटकावले. तसेच लहान गटात प्रथम क्रमांक कुमार आरूष प्रदीप पांचाळ ( शिव शंकर) दुसरा क्रमांक कुमारी असावरी प्रदीप पांचाळ व तृतीय क्रमांक कुमारी अक्षरा संदेश सावंत (झाशीची राणी लक्ष्मीबाई) यांनी पटकावला या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
भव्य फॅन्सी ड्रेस स्पर्धच्या बक्षीस वितरणासाठी आबलोलीच्या सरपंच सौ.वैष्णवी वैभव नेटके, शिवसेनेचे गुहागर तालुका प्रमूख सचिनशेठ बाईत, तालुका सचिव विलास गुरव, ग्रामसेवक बी.बी.सुर्यवंशी, विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष धामणस्कर गुरुजी, जिल्हा कोषाध्यक्ष विनायक काणेकर गुरुजी, जिल्हा सदस्य वासुदेव पांचाळ, पत्रकार उमेश शिंदे, पत्रकार संदेश कदम, आबलोली खालील पागडेवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष प्रमोद गोणबरे, उपाध्यक्ष अनंत पागडे, माजी सभापती सौ.पूर्वीताई निमूणकर, विठ्ठल रखुमाई नवतरुण मित्र मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाचे सचिव अजित रेपाळ, श्री.विश्वकर्मा नवरात्र उत्सव आबलोली पांचाळवाडी या मंडळाचे अध्यक्ष रमेश पांचाळ, उपाध्यक्ष संजय पांचाळ, सचिव नितेश पांचाळ, खजिनदार सुधिर पांचाळ, मुख्याध्यापक वाघमारे, माजी केंद्रीय प्रमुख रमेश जाक्कर, ग्रामपंचायत सदस्या सौ.पायल गोणबरे, सौ.शैला पालशेतकर, पोलीस पाटील महेश भाटकर, माजी उपसरपंच आशिष भोसले, विनायक गुरव, लक्ष्मी स्टील सेंटर चे मालक कृष्णकुमार शेठ, दिनेश भोसले यांचेसह नवरात्र उत्सव कमीटी सदस्य पदाधिकारी बहूसंख्येने उपस्थित होते. या भव्यदिव्य फॅन्सी ड्रेस कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मंडळाचे सचिव श्री. नितेश सुरेश पांचाळ यांनी केले.