मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस : पहिली सही रुग्ण साह्यासाठी
गुहागर, ता. 06 : आम्ही तिघेही समन्वयातून महाराष्ट्राला गतीने पुढे नेणार आहोत. वेगवेगळ्या योजना, पायाभूत सुविधांचा विकास करणारे प्रकल्प. आम्ही सुरु केले आहेत. निवडणुकीपूर्वी वचननामा जनतेसमोर ठेवला आहे. हे सर्व पूर्ण करण्याचे काम पुढच्या 5 वर्षात आम्ही करु. महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेकरीता पारदर्शीपणे हे सरकार काम करेल. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्र मंत्रालय व विधीमंडळ पत्रकार संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्र्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोकळेपणाने उत्तरे दिली. Devendra Fadnavis first press conference
वेगळे राजकारण पहायला मिळेल
बदल्याचे राजकारण आम्ही करणार नाही तर बदल दाखवून देण्याचे काम आम्ही करु. विरोधकांची संख्या कमी असली तरी त्यांच्या योग्य विषयांना 100 टक्के न्याय आम्ही देवू. त्यांचा सभागृहात आवाज दाबला जाणार नाही. याची काळजी घेऊ. महाराष्ट्रात एक चांगली राजकीय संस्कृती आहे. गेल्या 5 वर्षात या संस्कृतीला धक्का पोचेल अशी भाषा वापरली केली. मात्र मला जुनी राजकीय संस्कृती पुर्नस्थापित करायची आहे. आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे, शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे आदी नेत्यांना फोनद्वारे स्वत: निमंत्रण दिले. प्रत्येकाने माझे अभिनंदन केले. राजकीय संवाद सुरु झाला की हळुहळु बिघडलेले वातावरणही बदलेल. Devendra Fadnavis first press conference
लाडकी बहीण योजना
ही योजना सुरुच राहील. आश्र्वासन दिल्याप्रमाणे 2100 रुपये देण्यासाठी व्यवस्था केली जाईल. निकषाबाहेर लाडकी बहीणांना पैसे मिळाले असतील तर त्याचा पुर्नविचार होईल. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतही सुरवातीला सरसकट पैसे दिले गेले मात्र पुढील कालावधीत या योजनेचा लाभ निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच मिळु लागला. Devendra Fadnavis first press conference
सभापती निवड
विधानसभा अध्यक्षांची निवड ही 7 ते 9 डिसेंबर या विशेष अधिवेशनातच होईल. या तिन दिवसात शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि राज्यपालांचे अभिभाषण अशी शिफारस मंत्रीमंडळाने मा. राज्यपालांकडे पाठवली आहे. मंत्रीमंडळाबाबत आमची चर्चा पूर्ण झाली आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळाची नावे जाहीर होऊ शकतात. मागील महायुतीचे मंत्रीमंडळ आणि नवे मंत्रीमंडळ यात थोडे बदल होऊ शकतात. आम्ही गेल्या अडीच वर्षात मंत्र्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेत आहोत. त्यानुसार कोणत्या खात्याला कोणते मंत्री द्यायचे या निर्णय आम्ही तिघांनी एकत्र बसुन केला आहे. 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. थोडे काम बाकी आहे त्याबाबतचे निर्णयही आता अंतिम टप्प्यात आहेत. विरोधी पक्ष नेतेपदाचा निर्णय विधानसभेचे अध्यक्ष घेतात. तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही. अध्यक्षांचा निर्णय आम्हाला मान्य असेल. Devendra Fadnavis first press conference
शपथविधीला उशीर नाही
एका पक्षाचे सरकार स्थापन करणे सोपे असते. महायुतीचे सरकार बनणार असल्याने चर्चांची आवश्यकता असते. भविष्याचा विचार करुन खूप निर्णय घ्यायचे असतात. त्यामुळे शपथविधीला वेळ लागला. हे आजच घडलेले नाही. यापूर्वीही अनेकवेळा निकाल लागल्यानंतर 14 ते 20 दिवस सरकार स्थापनेसाठी लागल्याची नोंद आहे.
पुढच्या 5 वर्षात काय घडेल
काही विषय डोक्यात आहेत परंतु अजुन दोघांजवळ बोललो नाही. सौर उर्जेच्या प्रकल्पातून 60 मेगावॅट वीजनिर्मिती सुरु झाली आहे. काही दिवसात 100 मेगावॅटचा टप्पा आम्ही गाठू. कोणत्याही परिस्थितीत 2026 पर्यंत 16 हजार वीजनिर्मिती पर्यंत पोचायचे असे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे. नदीजोड प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. त्याचे काम सुरु झाले पाहीजे. ही शाश्वत विकासाची कामे आहेत. त्यातून शेतकऱ्याचे, राज्याचे कल्याण होणार आहे. जलयुक्त शिवार योजना अडीच वर्षात सुरु करण्याचे काम केले. ती अधिक प्रभावीपणे राबवायची आहे हे विकासाच्या वाटेवरील मुलभूत समस्या सोडविणारे प्रकल्प मार्गी लावताना अनेक अडचणी येतात. त्या दूर करण्यासाठी एकनाथजी शिंदे यांनी वॉर रुम तयार केली होती. ती वॉर रुम क्रियाशील करायची आहे. फ्लॅगशीप प्रकल्पांचा आर्थिक लेखाजोखा कॅग मांडते. त्याचप्रमाणे अशा प्रकल्पांची गुणवत्ता, सामाजिक परिणाम आदी बाबी तपासण्यासाठी एक व्यवस्था निर्माण करायची आहे. औद्योगिक क्षेत्रातही अनेक करार झाले आहेत. ते प्रकल्प महाराष्ट्रात काम सुरु करतील याकडे लक्ष द्यायचे आहे. गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राला गतीने पुढे नेण्यासाठी जे निर्णय घेतले आहेत त्या सर्व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करणे हेच सध्याचे लक्ष्य आहे. Devendra Fadnavis first press conference
मुख्यमंत्री आरोग्य कक्षातून 5 लाखाचा निधी
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पहिली मंत्रीमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मी पहीली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातील एका फाईलवर केली आहे. पुण्यातील रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने पतीच्या बोन नॅरो ट्रान्सप्लांटसाठी मदत मागितली होती. Devendra Fadnavis first press conference
विकासाचे महामार्ग
शक्तीपिठ महामार्गाला सांगली जिल्ह्यापर्यंत पूर्ण समर्थन आहे. सांगलीतील काही भागव कोल्हापूर जिल्हा सुरु होतो तेथे विरोध होतोय. ज्या ठिकाणी विरोध नाही तिथे पुढील कामाला सुरवात करायचा निर्णय आम्ही घेतलाय. कोणत्याही शेतकऱ्याला नाराज करुन, धाकधपटशहा दाखवून त्याची जमीन आमचे सरकार घेणार नाही. त्यांच्याशी संवाद साधुनच पुढचे निर्णय होतील. समृध्दी महामार्गामुळे महाराष्ट्राचे नवीन औद्योगिक क्षेत्र जालना, संभाजीनगर मध्ये विकसीत होत आहे. कमी कालावधीमध्ये शेतमाल मुंबईत पोचु लागल्याने शेतकऱ्यांनाही त्याचा लाभ झाला. शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचे चित्र बदलणार आहे. म्हणून या महामार्गाबद्दल मी आग्रही आहे. मुंबई गोवा महामार्गाचा विषय काढला आमची अडचण होते. गडकरी साहेबांनी संसदेत सांगितले की, देशाच्या कानाकोपऱ्यातील महामार्ग पूर्ण झाले परंतु मुंबई गोवा महामार्ग मार्गी लागत नाही. परंतु सध्या गतीने महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. Devendra Fadnavis first press conference
शिंदेची नाराजी हा माध्यमांचा शोध
एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी चालवल्या. मात्र एकनाथ शिंदे नाराज नव्हते. आमच्यात योग्य समन्वय होता. अडीच वर्षांपूर्वी मी देखील उपमुख्यमंत्री होण्यास तयार नव्हतो. मात्र मोदीजींनी सांगितल्यावर मी तो निर्णय स्विकारला. सत्तेत असल्यामुळे आमच्या आमदारांमध्ये अस्वस्थता नव्हती. हाच विषय एकनाथ शिंदे यांना सांगून विनंती केल्यावर ते उपमुख्यमंत्री होण्यास तयार झाले. कोणत्याही मंत्रालयाबाबत कोणीही आग्रही नाही. समन्वयातून मंत्रालय आणि मंत्री ठरतील. Devendra Fadnavis first press conference
जातीनिहाय जनगणनेला भाजपाच विरोध नाही
जातीनिहाय जनगणेनचा पहिला प्रयोग आम्हीच बिहारमध्ये केला. त्यामुळे आमचा जातिनिहाय जनगणनेला विरोध नाही. मात्र या जनगणनेचा उपयोग काहीजणांना अस्त्र म्हणून करायचा आहे. हे योग्य नाही. देशात विविध जाती संप्रदायांचे लोक रहातात. त्यांना एकमेकांच्या विरोधात भडकवून देशाला अस्थिर करण्याचे काम काहीजणांना करायचे आहे. Devendra Fadnavis first press conference