गुहागर, ता. 04 : गुहागर विधानसभा मतदार संघातून भाजपाने माजी आमदार, गुहागर विधानसभा निवडणूक प्रमुख डॉ. विनय नातू यांच्या नेतृत्वात महायुती मधून 2024 मध्ये लढण्याची पूर्वतयारी जोरदारपणे सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिफारशीने ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी 1 कोटीच्या विकास कामांना मंजूरी दिली आहे. Development works approved on Bawankule’s recommendation
यामध्ये गुहागर तालुक्यातील विसापूर कारूळ कुणबीवाडी कालिकामंदिर रस्ता डांबरीकरण 7 लाख, कोतळूक किरवलेवाडी साकवाकडे जाणारा रस्ता सुधारणा व डांबरीकरण 10 लाख, असगोली वरचीवाडी संरक्षक भिंत बांधणे 5 लाख, पोमेंडी गुरवांचा पायंडा ते जनार्दन विचारे रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे 5 लाख, वेळंब वचनवाडी उर्वरीत रस्ता सुधारणा व डांबरीकरण 7 लाख, मढाळ सोलकरवाडी शंकर मंदिराकडे जाणारा रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे 7 लाख, पालपेणे कुंभारवाडी पीर ते टेपवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे 7 लाख चिपळूण तालुक्यातील दहिवली खुर्द ग्रामदेवता मंदिर रस्ता सहाणेकडून सुधारणा व डांबरीकरण करणे 10 लाख, मार्गताम्हाणे मुख्य रस्ता ते बाजारपेठ घाणेकरवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे 10 लाख, मुर्तवडे ग्रामदेवता मंदिर रस्ता सुधारणा व डांबरीकरण 7 लाख, खेड तालुक्यातील आंबडस येथे प्रजिमा 110 ते मांडवकरवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे 5 लाख, लोटे रामा 66 ते बोरवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे 5 लाख, भोस्ते वीराचीवाडी ते राकेश पाटील यांच्या घरामागे प-याला संरक्षक भिंत बांधणे 5 लाख, भेलसाई येथे प्रजिमा 20 ते भेलसाई डोंगरवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे 5 लाख, असगणी मुख्य रस्ता ते नायनाकवाडी कुळेवाडी रस्ता सुधारणा व डांबरीकरण करणे 5 लाख अशा 15 कामांना 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. Development works approved on Bawankule’s recommendation
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महायुतीतील पालकमंत्री व सर्व मंत्री यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. डॉ विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांचा हा सुरू झालेला ओघ या पुढच्या काळात सुद्धा असाच जोमाने प्रवाहीत राहणार असून समाजातील शेवटच्या घटकाला आवश्यक आणि अपेक्षित विकासकामे पुढील काळात होणार असल्याचे भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष व जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी सांगितले. Development works approved on Bawankule’s recommendation