• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
1 June 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यातील 73 लाखांच्या कामांना मंजुरी

by Ganesh Dhanawade
April 9, 2021
in Old News
17 0
0
गुहागर तालुक्यातील 73 लाखांच्या कामांना मंजुरी
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तालुकाध्यक्ष आरेकरांच्या प्रयत्नांना यश, 13 कामांना मिळाला निधी

गुहागर, ता. 9 : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुचविलेल्या कामांपैकी 13 कामे मंजूर झाली आहेत. या कामांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 73 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी आज दिली. सदर कामे मंजुर केल्याबद्दल आरेकर यांनी खासदार सुनील तटकरे यांचे आभार मानले आहेत.
The Guhagar Taluka Nationalist Congress Party suggested 13 Development Proposals have been approved. Rs. 73 Lakhs sanctioned by District Planning Commission. Rajendra Arekar President of Guhagar Taluka Nationalist Congress Party Said,  these proposals are sanctioned due to contribution of MP Sunil Takare.
गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खासदार सुनील तटकरे यांच्याकडे विकास कामांचे प्रस्ताव पाठवले होते. त्यापैकी 13 कामांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये जिल्हा वाषिर्क साकव दुरुस्ती योजनेमधुन पालशेत घुरटवाडी येथे साकव बांधण्यासाठी 15 लाख रुपये मंजुर झाले आहेत. जिल्हा नियोजनमधुन चिखली स्वामी समर्थ मठ ते मुख्य आरोग्य केंद्र रस्त्याचे डांबरीकरणासाठी 5 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. मुख्य आरोग्य केंद्राची इमारत झाली त्यावेळी बांधलेला हा रस्ता पूर्णपणे उखडला होता. त्यातच महामार्गाची उंची वाढल्याने महामार्गावरुन आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतरणे धोक्याचे बनले होते.  याशिवाय कुटगिरी घाडेवाडी ते नदी रस्ता डांबरीकरण 5 लाख, तवसाळ भंडारवाडा एस. टी. स्टॅण्ड ते मुस्लिम मोहल्ला रस्ता डांबरीकरण 4 लाख, वाकी पिंपळवट ते कचरनाथ स्वामी मठ डांबरीकरण 5 लाख, त्रिशुळ साखरी पुल ते वेद्रेवाडी शाळा नं. २ रस्ता ४ लाख अशा 23 लाखाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.
पर्यटन विकासासाठी जिल्हा वार्षिक नियोजन अंतर्गत काही निधी खर्च करायचा असतो. गुहागर तालुक्यातील तवसाळ काशविंडा बीच सुशोभिकरण, वेळणेश्र्वर मंदिरासमोरील मंदिराचे सुशोभिकरण आणि पडवे गणेश मंदिर सुशोभिकरणाचे काम पर्यटन विकास अंतर्गत करावे अशी मागणी गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. त्यालाही खासदार तटकरेंच्या प्रयत्नांतून मंजुरी मिळाली आहे. तवसाळ, वेळणेश्र्वर आणि पडवे येथील या कामांसाठी प्रत्येकी 7 लाखाचा निधी जिल्हा वार्षिक नियोजनमधुन मंजूर झाला आहे.
Form Tourim Development Head, 21 lakhs sanctioned through MP Sunil Tatkare. For Velneshwar and Padave Temple Campus Development and Tavsal Beach Beautification.
जनसुविधा योजने अंतर्गत पडवे स्मशान शेड, तवसाळ आगर स्मशान शेड आणि चिंद्रावळे येथे सफळेवाडी, गावडेवाडी, गराटेवाडी या तीन वाड्यांसाठी एक स्मशान शेड बांधण्यासाठी प्रत्येकी 2 लाख 54 हजार असा निधी खासदार सुनील तटकरे यांनी मिळवून दिला आहे. अशी माहिती तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर यांनी दिली.

Tags: BeachBreaking NewsGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsMP Sunil TakareNationalist Congress PartyNCPNews in GuhagarNews in MarathiTourism Developmentखासदार सुनील तटकरेटॉप न्युजताज्या बातम्यापर्यटन विकासब्रेकिंग न्युजमराठी बातम्याराष्ट्रवादी काँग्रेस पक्षलेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.