• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

विकसित भारत संकल्प  यात्रा

by Guhagar News
December 9, 2023
in Bharat
112 2
0
Developed Bharat Sankalp Yatra
221
SHARES
631
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संकल्प यात्रेने ओलांडला 1 कोटी सहभागींचा टप्पा

दिल्ली, ता. 09 : झारखंडमधील खुंटी येथून 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रा ही देशभरातील नागरिकांशी संपर्क वाढवणारी एक परिवर्तनकारी मोहीम म्हणून उदयास आली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने विकसित केलेल्या सानुकूलित पोर्टलवर प्राप्त डेटानुसार, 7 डिसेंबर 2023 पर्यंत, 36,000 ग्रामपंचायतींमध्ये ही यात्रा पोहोचली आणि 1 कोटीहून अधिक नागरिकांचा त्यात सहभाग होता. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य उत्तर प्रदेश 37 लाखांहून अधिक लोकांच्या सहभागाने आघाडीवर आहे, त्याखालोखाल महाराष्ट्रात 12.07 लाख आणि त्यापाठोपाठ गुजरातमध्ये 11.58 लाख लोकसहभाग होता. जम्मू आणि काश्मीरमध्येही या यात्रेचे उत्साहवर्धक स्वागत झाले असून, आजमितीस 9 लाखांहून अधिक लोक सहभागी झाले आहेत. Developed Bharat Sankalp Yatra

Developed Bharat Sankalp Yatra

दिवसेंदिवस लोकसहभागाने अधिकाधिक वेग घेतला आहे. संकल्प यात्रेच्या पहिल्या आठवड्यात 500,000 नागरिकांचा सहभाग होता, तर गेल्या 10 दिवसांत देशभरातील 77 लाखांहून अधिक लोक यात्रेत सहभागी झाले होते. शहरी भागातली यात्रा अल्पावधीत, 700 हून अधिक ठिकाणी पोहोचली  आहे आणि 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न करण्याची शपथ 79 लाख व्यक्तींनी घेतली आहे. Developed Bharat Sankalp Yatra

लोकांनी सरकारी योजनांचा त्यांच्या फायद्यासाठी अंगीकार करावा या आवाहनासाठी माहिती, शिक्षण आणि दळणवळण (आयइसी) व्हॅन वापरून ही यात्रा 2.60 हून अधिक ग्रामपंचायती आणि 3600 हून अधिक शहरी स्थानिक संस्थांपर्यंत पोहोचण्याचा अभूतपूर्व प्रयत्न करत आहे. यात्रेचा केंद्रबिंदू महिला-केंद्रित योजनांबद्दल जागरुकता वाढवत आहे, ज्यामुळे 46,000 हून अधिक लाभार्थींनी पीएम उज्ज्वला योजनेसाठी नोंदणी केली आहे. आरोग्य शिबिरे देखील एक मोठी मोहीम ठरली आहेत आणि आजपर्यंत 22 लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे. Developed Bharat Sankalp Yatra

विकसित भारत संकल्प यात्रेचा एक भाग म्हणून दाखवण्यात आलेल्या शेतकऱ्यांसाठीच्या ड्रोन प्रात्यक्षिकाने उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘ड्रोन दीदी योजने’ अंतर्गत 15,000 महिला बचत गटांना ड्रोन देण्याबरोबरच गटातील दोन सदस्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जाणार असल्याने, या ड्रोन उड्डाणांचे साक्षीदार होण्यासाठी महिला  मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. स्वयंसहायता बचत गट ही ड्रोन सेवा शुल्क आकारून भाड्याने देतील, जो बचत गटाच्या सदस्यांसाठी कमाईचा आणखी एक स्रोत ठरेल. Developed Bharat Sankalp Yatra

Tags: Developed Bharat Sankalp YatraGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share88SendTweet55
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.