• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 November 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

प्रमोद कोनकर यांना देवर्षि नारद पत्रकार सन्मान

by Guhagar News
April 27, 2023
in Ratnagiri
48 0
0
Devarshi Narad Journalist Award to Konkar
94
SHARES
268
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई राजभवनात दि.३ मे रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते वितरण

रत्नागिरी, ता.27 : येथील ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर यांना मुंबईतील विश्व संवाद केंद्राचा (World Communication Center) यावर्षीचा देवर्षि नारद पत्रकार सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. दि.३ मे रोजी दुपारी १२ वाजता मुंबईत राजभवनात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते श्री. कोनकर यांना सन्मानाचे वितरण करण्यात येणार आहे. विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी ही माहिती दिली. Devarshi Narad Journalist Award to Konkar

विश्व संवाद केंद्रातर्फे उदयोन्मुख पत्रकारांसाठी कार्यशाळा, पत्रलेखकांसाठी वर्ग, सोशल मीडियाचा सामाजिक कार्यासाठी उपयोग, स्तंभलेखक कार्यशाळा आणि मूल्याधारित पत्रकारिता करणार्‍या पत्रकारांचा सन्मान असे अनेक उपक्रम राबविले जातात. देवर्षी नारद हे आद्य पत्रकार होते, अशी विश्व संवाद केंद्राची धारणा आहे. त्यामुळे प्रतिवर्षी नारद जयंतीला मूल्याधारित पत्रकारिता करणार्‍या माध्यम प्रतिनिधींचा आणि सोशल मीडियावर समाजहित डोळ्यांपुढे ठेवून लेखन करणार्‍यांचा सन्मान करण्यात येतो. Devarshi Narad Journalist Award to Konkar

सन्मान सोहळ्याचे हे बाविसावे वर्ष असून यावर्षीच्या सन्मानासाठी श्री. कोनकर यांची निवड झाली आहे. उदय निरगुडकर, दिनेश गुणे, किरण शेलार आणि मृणालिनी नानिवडेकर यांच्या समितीने ही निवड केली. गेली ४४ वर्षे पत्रकारितेमध्ये असलेले श्री. कोनकर रत्नागिरीतील साप्ताहिक कोकण मीडियाचे (Konkan Media) संपादक, आकाशवाणी आणि हिंदुस्थान समाचार वृत्तसंस्थेचे रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी आहेत. Devarshi Narad Journalist Award to Konkar

Tags: AkashvaniDevarshi Narad Journalist Award to KonkarEditorGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKonkan MediaLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWorld Communication Centerआकाशवाणीगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजसंपादक
Share38SendTweet24
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.