रत्नागिरी, ता. 28 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात ग्राहक दिन साजरा करण्यात आला. प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. राखी साळगावकर यांनी केले. Dev, Ghaisas, Kir College Celebrates Customer Day


या दिनानिमित्त वाणिज्य विभागातर्फे बौद्धिक संपदा अधिकार या विषयांवर व्याख्यान ठेवण्यात आले होते. या साठी प्रमुख वक्ते म्हणून श्रीमान भागोजीशेठ कीर लॉ कॉलजचे प्र. प्राचार्य अॅड. डॉ. आशिष बर्वे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना बौद्धिक संपदा अधिकार संदर्भात उत्तम मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या मधुरा पाटील, उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, वाणिज्य विभागप्रमुख प्रा. राखी साळगावकर, वाणिज्य शाखेचे प्राध्यापक, विद्यार्थी, तसेच इतर शाखांचे विद्यार्थी इतर प्राध्यापक उपस्थित होते. सूत्रसंचालन गौरवी ओळकर हिने केले. Dev, Ghaisas, Kir College Celebrates Customer Day