• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

देव, घैसास, कीर महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव

by Guhagar News
July 23, 2024
in Ratnagiri
90 1
2
Dev, Ghaisas, Keer College Welcome Ceremony
177
SHARES
505
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 23 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय आयक्यूएसी अंतर्गत समारंभ समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्ष प्रवेशित, नवागतांचा स्वागतोत्सव साजरा करण्यात आला. Dev, Ghaisas, Keer College Welcome Ceremony

या कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षा मधुरा पाटील यांच्या हस्ते दीप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर समारंभ समिती प्रमुख सोनाली जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांची ओळख करून देण्यात आली. द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यानी यावेळी कलाविष्कार सादर केले. फनी गेम्स घेण्यात आले. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमातील सहभागातून मिस फ्रेशर हा किताब गौरवी ओळकर (प्रथम वर्ष वाणिज्य) व मिस्टर फ्रेशर हा किताब कुणाल विचारे (प्रथम वर्ष वाणिज्य) यांना प्राचार्यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन कौतुक करण्यात आले. प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांनी नवागतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. Dev, Ghaisas, Keer College Welcome Ceremony

कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वसुंधरा जाधव, कला विभाग प्रमुख ऋतुजा भोवड, विज्ञान विभाग प्रमुख वैभव घाणेकर, वाणिज्य विभाग प्रमुख राखी साळगावकर, समारंभ समिती प्रमुख सोनाली जोशी, पस्थित होते. प्रथम व द्वितीय वर्षातील तिन्ही शाखांचे विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अमिषा मडके आणि ईशा कीर यांनी केले. तर आकाश रणसे यानी आभार मानले. Dev, Ghaisas, Keer College Welcome Ceremony

Tags: DevDev Ghaisas Keer College Welcome CeremonyGhaisasGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiKeer College Welcome CeremonyLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share71SendTweet44
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.