• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालकोट, आरे, वाघिवरेतील वाड्याच्या वाड्या शिवसेनेत

by Manoj Bavdhankar
October 14, 2024
in Politics
252 3
0
Determined to stand by MLA Jadhav
495
SHARES
1.4k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार भास्करराव जाधव यांच्या पाठीशी राहण्याचा एकमुखी निर्धार

गुहागर, ता. 14 : वर्षानुवर्ष भाजप व इतर पक्षांच्या पाठीशी राहून देखील विकासापासून वंचित राहिलेल्या गुहागर तालुक्यातील पालकोट, आरे आणि चिपळूण तालुक्यातील वाघिवरे येथील शेकडो ग्रामस्थांनी काल मुंबईत मतदारसंघाचे आमदार शिवसेना नेते श्री. भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये जाहीर प्रवेश केला आणि यापुढे कायम पाठीशी राहण्याचा शब्द दिला. आमदार श्री. भास्करराव जाधव यांनी काल मुंबईत शिवसेना भवन येथे मुंबईवासी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी उपरोक्त गावातील अनेक मुंबईकर ग्रामस्थ त्यांच्या भेटीसाठी आले होते. Determined to stand by MLA Jadhav

Determined to stand by MLA Jadhav

पालकोट हे गाव पिढ्यानपिढ्या भाजपच्या पाठीशी राहणारे होते. या गावांमध्ये शिवसेनेला हाताच्या बोटावर मोजण्याइतकी सुद्धा मतं मिळत नव्हती. सातत्याने प्रयत्न करून देखील या मंडळींचे मन आणि मतपरिवर्तन होत नव्हते. परंतु एका पक्षाच्या वर्षानुवर्षे पाठीशी राहून आणि राज्यात व केंद्रात या पक्षाची सत्ता असूनदेखील त्यांच्याकडून गावातील विकासकामे मार्गी लागत नाहीत. दुसरीकडे आजूबाजूच्या गावांचा तसेच संपूर्ण तालुक्यात होत असलेला आणि झालेला विकास पाहून मुंबईकर आणि स्थानिक ग्रामस्थ एकत्र आले. विरोधी पक्षाचे आमदार असताना देखील आमदार श्री. भास्करराव जाधव विकासात कुठेही कमी पडत नाहीत. त्यामुळे यापुढे आपण देखील सर्वांनी अशा काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी राहूया असा निर्णय करूनच सर्वजण भेटीसाठी आले होते. आमदार श्री जाधव यांच्याशी झालेल्या चर्चेने ही सर्व मंडळी प्रभावित झाली आणि त्यांनी तात्काळ पक्ष प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. Determined to stand by MLA Jadhav

Determined to stand by MLA Jadhav

यावेळी मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. अशोक वेद्रे, सुरेश पारदळे, आनंद पारदळे,  सुरेश निकम, तुषार निकम, मनोज वेद्रे, संदीप वेद्रे, रघुनाथ वेद्रे, प्रमोद वेद्रे, विलास वेद्रे, संतोष वेद्रे, विनोद वेद्रे अनिल काताळे, संतोष पारदळे, राहुल वेद्रे, महेंद्र निकम, विनोद वेद्रे, विशाल वेद्रे, शैलेश वेद्रे, अमोल पारदळे, प्रकाश वेद्रे, कृष्णा बेद्रे, निलेश पारदळे, दत्ताराम पारदळे, ज्ञानदेव पारदळे यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी यावेळी पक्षप्रवेश केला. Determined to stand by MLA Jadhav

Determined to stand by MLA Jadhav

अशाच प्रकारे गुहागर तालुक्यातील आरे गावाच्या कुडतुडवाडीचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल सुवरे, शिवनाथ काजारे, नरेश वीर, सुनील हुमणे, रघुनाथ सोलकर, वैभव भुवड, सुरेश हुमणे, जगदीश सोलकर यांच्यासह त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांनी पक्षप्रवेश केला. Determined to stand by MLA Jadhav

चिपळूण तालुक्यातील वाघीवरे घडशी रेवाळेवाडीच्या मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुरेश रेवाळे, महादेव कारते, कृष्णा कांबळे, राकेश मास्कर, नरेश घडशी, गणपत कारते, रोहित खांबे, महेश कारते, समीर रेवाळे, नितेश घडशी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गावच्या मुंबईवासी ग्रामस्थांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आमदार श्री भास्करराव जाधव यांनी पक्ष प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले आणि यापुढे विकासकामासाठी कोणापुढेही हात पसरण्याची वेळ तुमच्यावर येऊ देणार नाही, असा शब्द या तिन्ही गावातील ग्रामस्थांना दिला. Determined to stand by MLA Jadhav

Tags: Determined to stand by MLA JadhavGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share198SendTweet124
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.