• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
30 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जगातील सर्वात मोठ्या हिमखंडाचा विनाश

by Guhagar News
January 25, 2025
in Bharat
264 3
0
Destruction of the world's largest iceberg
519
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पृथ्वीवर आदळणार; लाखो प्राण्यांचे जीवन धोक्यात

वाँशिंग्टन, ता. 25 : जगातील सर्वात मोठा हिमखंड A23a आता विनाश घडवण्याची शक्यता आहे. तो दक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण अटलांटिकमध्ये असलेल्या आसपासच्या बेटांशी टक्कर देण्याच्या मार्गावर आहे. यामुळे या क्षेत्राच्या अद्वितीय आणि समृद्ध जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पृथ्वीच्या ज्या ठिकाणावर हिमखंड A23a आदळणार आहे, त्या ठिकाणी पेंग्विन, सील आणि दुर्मिळ सागरी प्रजातींचा आधीवास आहे. जर ही टक्कर झाली तर लाखो प्राण्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते. Destruction of the world’s largest iceberg

A23a हिमखंडाचा आकार ग्रेटर लंडनच्या दुप्पट असल्याचे सांगितले जाते. 1986 मध्ये तो फिल्चनर-रोन आइस शेल्फपासून वेगळा झाला. सुरुवातीच्या दशकांमध्ये तो समुद्राच्या तळाशी अडकला आणि हळूहळू वितळत गेला. 2020 मध्ये तो दक्षिण महासागराकडे वाटचाल करू लागला आणि 2023 मध्ये तो पूर्णपणे मुक्त झाला आणि त्याने पुन्हा आपला प्रवास सुरू केला. Destruction of the world’s largest iceberg

Big boost to Maharashtra's development

‘टेलर कॉलम्स’ नावाच्या समुद्री भोवऱ्यांमध्ये हा हिमखंड अडकलेला आढळला. हे भोवरे समुद्राखालील टेकड्यांमुळे होतात आणि हिमखंडांना थांबवू शकतात. याच्या वजनाबद्दल अनेकांच्या मनात उत्सुकता असते. A23a चे वजन एक ट्रिलियन टनांपेक्षा जास्त होते. इतके वजन असूनही तो या भोवऱ्यांपासून वाचण्यात यशस्वी झाला. दक्षिण जॉर्जिया क्षेत्र हे जैवविविधतेचे समृद्ध केंद्र आहे. या बेटावर पेंग्विन आणि सील मोठ्या संख्येने राहतात. जर A23a येथे आदळला तर येथील प्राण्यांना अन्नासाठी सागरी भागात जाण्यास मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. Destruction of the world’s largest iceberg

‘आइसबर्ग हा मूळत: खूप धोकादायक आहेत. जर तो आदळण्यापासून चुकला तर आम्हाला खूप आनंद होईल, असे दक्षिण जॉर्जिया सरकारी जहाज फॅरोसचे कॅप्टन सायमन वॉलेस यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितले. या भागातील वन्य जीवांना एखाद्या हिमखंडामुळे धोका निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2004 मध्ये दक्षिण जॉर्जियाजवळ A38-B नावाच्या एका हिमखंडाचा भाग समुद्रात अनेक महिने अडकून राहिला होता. ज्यामुळे पेंग्विन आणि सील त्यांच्या खाद्याच्या ठिकाणी पोहोचू शकत नव्हते. Destruction of the world’s largest iceberg

Tags: Destruction of the world's largest icebergGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share208SendTweet130
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.