• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

UPSC/ MPSC संदर्भात उपमुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

by Guhagar News
August 12, 2023
in Bharat
96 2
0
Deputy CM announced regarding UPSC/MPSC
190
SHARES
542
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

‍गुहागर, ता. 12 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी, यूपीएससी विद्यार्थ्यांसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)ची स्थापना केली आहे. अमृत संस्थेमार्फत या घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच नोकरीसाठी इच्छुक युवकांसाठी यूपीएससी, एमपीएससीचे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी संस्थेला यावर्षी 150 कोटी रुपये देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. Deputy CM announced regarding UPSC/MPSC

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत संस्थेच्या अडीअडचणी आणि भविष्यातील योजनांबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. तसेच अमृत संस्थेचे कामकाज प्रभावीपणे व्हावे यासाठी व्यवस्थापकीय संचालक या पदासह इतर पदांची निर्मिती करण्यात आली आहे. अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी संस्थेच्या भविष्यातील योजनांची माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे दिली. Deputy CM announced regarding UPSC/MPSC

या संस्थेची स्थापना करण्यामागचा उद्देश म्हणजे, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी अभ्यासक्रम, परिषद, व्याख्याने, चर्चासत्रे आयोजित करणे आणि सुलभ करणे आणि पुस्तके, जर्नल्स आणि शोधनिबंध प्रकाशित करणे, स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यास केंद्रे स्थापन करणे, विविध व्यवसाय, उद्योग विकास असा आहे. Deputy CM announced regarding UPSC/MPSC

Tags: Deputy Chief Minister Devendra FadnavisDeputy CM announced regarding UPSC/MPSCGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share76SendTweet48
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.