• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्यभरातील धरणसाठ्यात मोठी घट

by Guhagar News
May 5, 2024
in Maharashtra
77 1
0
Depletion of dams across the state
151
SHARES
432
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई, ता. 05 : एकीकडे उष्णतेचा पारा रोज नवे उच्चांक गाठत असताना, दुसरीकडे मात्र राज्यभरातील धरणसाठ्यातही मोठी घट झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील पाणीसंकट अधिक गडद झाल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागत आहे. तर संभाव्य पाणीबाणी लक्षात घेता सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. Depletion of dams across the state

राज्यभरात ज्या ठिकाणी पाण्याची टंचाई अधिक तीव्र स्वरूपात आहे, त्या ठिकाणी पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. यंदा राज्यभरात अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणत पाऊस झाल्याने त्याचा थेट परिणाम हा धरण साठ्यावर झाला आहे. परिणामी, ऐन उन्हाळ्यात धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने गरजेप्रमाणे पाणी पुरवठा होऊ शकत नाहीये. त्यात यंदा उन्हाची तीव्रता ही अधिक असल्याने आहे तो पाणीसाठा ही वेगाने घटत असल्याने पाणी टंचाईचे सावट पसरले आहे. Depletion of dams across the state

सध्या राज्यभरात साडेतीन हजाराहून अधिक ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू असून पुढील काळात गरज पडल्यास त्याची संख्या अजून वाढू शकणार असल्याचा अंदाज आहे. तर ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे त्या ठिकाणी पाण्याची बचत करण्याचा सूचनाही देण्यात आल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. राज्यात ज्या ठिकाणी आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणच्या खासगी विहिरीही अधिग्रहित करण्यात येणार आहे. पाऊस सुरू होण्यासाठी अद्याप दोन महिने कालावधी असल्याने आहे ते पाणी अतिशय काटकसरीने वापरण्याचे नियोजन सरकार करत आहेत. तर सध्या धरणसाठा असलेले पाणी केवळ पिण्याच्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात येतं असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरावे, ते देशाचं काम आहे अस समजून त्याच नियोजन करून सहकार्य करण्याचं आवाहन मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. Depletion of dams across the state

Tags: Depletion of dams across the stateGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet38
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.