गुहागर, ता. 30 : तालुक्यात ऑक्टोबर हिटची तीव्रता वाढत असून, कडक उन्हामुळे लहान विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्यात याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रथमेश प्रदीप रायकर यांच्यावतीने गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती गुहागर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. Demand to hold school in the morning session
सध्या दुपारच्या वेळेत उन्हाची तीव्रता अधिक जाणवत असल्याने शाळेत ये-जा करताना तसेच शाळेच्या वेळेत विद्यार्थ्यांना उष्णतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना डिहायड्रेशन, चक्कर येणे, अशक्तपणा व उष्माघातासारख्या आरोग्यविषयक समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेवर आणि अध्ययन-अध्यापन प्रक्रियेवरही होण्याची शक्यता निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता ही सर्वाधिक महत्त्वाची बाब असून, उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत तालुक्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याबाबत प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा. तसेच संबंधित शाळांना स्पष्ट सूचना देऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मनविसेने केली आहे. Demand to hold school in the morning session
विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने वेळीच खबरदारी घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे गुहागर तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, तालुका सचिव प्रशांत साटले आणि गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासन या मागणीवर सकारात्मक निर्णय घेणार का, याकडे आता पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. Demand to hold school in the morning session