गुहागर, ता. 01 : देवरुख येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवरुखवासियांनी सावरकर चौक येथे एकत्र येवुन अभिवादन केले. यावेळी स्वातंत्रवीर सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन अण्णा शहाणे, व हेमंत तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. Demand to declare freedom hero Savarkar as Bharat Ratna

यावेळी युयुत्सु आर्ते म्हणाले की, स्वातंत्र्यकाळातील सावरकरांचे कार्य महान आहे. स्वातंत्र्यसंग्रमातील त्यांची केलेली कामगिरी पहाता सावरकर यांना सरकारने भारतरत्न जाहिर करावे, अशी देवरुखवासियांतर्फे मत व्यक्त केले. या मागणीसाठी लढा उभारला जाईल, सह्यांचे निवेदन शासनापर्यंत पोहचवले जाईल, प्रसंगी याच चौकात आंदोलनही करण्याची तयारी सर्वांनी बोलुन दाखवली. अण्णा शहाणे, अभिजीत शेट्ये यांनीही मनोगतात भारतरत्नसाठी पाठींबा दर्शवला. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर चौकातील सुशोभीकरणाचे काम लवकरच हाती घेतले जाईल अशी ग्वाही नगराध्यक्षांनी दिली. Demand to declare freedom hero Savarkar as Bharat Ratna
यावेळी नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, नगरसेविका प्रतिक्षा वणकुद्रे, जेष्ठ नागरीक संघाचे अण्णा शहाणे, अनिल साळवी, युयुत्सु आर्ते, हेमंत तांबे, अमोल प्रभुघाटे, राजु वणकुद्रे, रंजना कदम, सुजाता प्रभुघाटे, अशोक राठोड, प्रशांत काबदुले, मंडळाचे अध्यक्ष राजु वणकुद्रे, माजी उपनगराध्यक्ष अभिजीत शेट्ये आदिंसह व्यापारी, नागरीक उपस्थित होते. Demand to declare freedom hero Savarkar as Bharat Ratna

