• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मुबलक पाणी असलेली विहिर दुरूस्ती करावी

by Manoj Bavdhankar
May 24, 2023
in Guhagar
110 1
0
Demand of Guhagar villagers to the administration
215
SHARES
615
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर तांबडवाडी येथील ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी

गुहागर, ता. 24 : खालचा पाठ तांबडवाडी येथील मुबलक पाणी असलेली 70 वर्षांपूर्वीची विहिर खचत असून लवकरच संबंधित प्रशासनाने या विहिरीची दुरूस्ती करावी, अशी मागणी स्थानिक जनतेतून होत आहे. ही विहिर महावितरणचे स्विच  यार्ड जवळ असून, या विहिरीत मुबलक पाणी आहे. Demand of Guhagar villagers to the administration

Demand of Guhagar villagers to the administration

गुहागर तांबडवाडी येथील ही विहिर खचली असून विहिरीचा बांधही ढासळलेला आहे. ज्यावेळी पाण्याचे स्त्रोत कमी होतो. त्या वेळेला जांगळवाडी, तांबडवाडी, असगोली येथील नागरिक या विहिरीतील पाणी पिण्यासाठी व कपडे धुण्यासाठी वापर करतात. परंतु आता ग्रामपंचायत नगरपंचायतचे पाणी असल्यामुळे या विहिरीचा वापर कमी झालेला आहे. तरीही मे महिन्यात कमी पाणी असल्यास या विहिरीचा अद्यापही वापर केला जातो.  या विहिरीचा बांध कोसळल्यामुळे भितीदायक झाले आहे. कारण उर्वरित बांध कोसळून विहीर बुजण्याची भीती  स्थानिकांना आहे. Demand of Guhagar villagers to the administration

या विहिरीच्या कठड्यावरून बघितलं तर आजही आठ ते दहा फुटावरच पाणी दिसते. पूर्वी पाणी आटले तर  विहिरीत उतरून  पाण्याचे हंडे भरून काढत असल्याची आठवण येथील युवक सांगतात. चाकरमानी आजही गावात आल्यावर या विहिरीत पाणी बघायला आवर्जून जातात. सध्या पाण्याचे स्तोत्र कमी होत असून पाण्याचा  तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. यामुळे संबंधित प्रशासनाने या विहिरीची देखभाल दुरुस्ती करून ही विहीर सुस्थितीत ठेवावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. Demand of Guhagar villagers to the administration

Tags: Demand of Guhagar villagers to the administrationGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share86SendTweet54
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.