• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली व शृंगारतळी येथे प्रवाशांच्या गैरसोयीकडे प्रशासन लक्ष देईल का?

by Ganesh Dhanawade
May 6, 2023
in Guhagar
233 2
0
Demand for ST stop at Aabaloli and Shringartali
457
SHARES
1.3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसेचे माजी तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांचा सवाल

गुहागर, ता. 06 : तालुक्यातील महत्वाच्या बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या तसेच आर्थिक उलाढाल होत असलेल्या आबलोली आणि शृंगारतळी या बाजारपेठेत औषधोपचारसाठी, खरेदीसाठी आजूबाजूच्या २० ते २५ गावातील लोकांची गर्दी होत असते. यावेळी खरेदीबाजार व इतर कामे उरकून गाडीची प्रतिक्षा करत येथील ग्रामस्थांना भर उन्हात ताटकळत, तर कधी कधी दुकानदारांच्या दुकानाचा सहारा घेऊन तासंनतास उभे रहावे लागते. सद्या कडाक्याचा उन्हाळा असल्यामूळे नागरिकांना उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. हिच अवस्था पावसाळ्यातही भिजल्याने होणार असल्याने प्रवाशांना बसण्यासाठी प्रशासनाने आबलोली आणि शृंगारतळी बाजारपेठेत पिकअप शेड बांधावी अशी आग्रही मागणी मनसेचे माजी तालुका संपर्क अध्यक्ष गणेश कदम यांनी केली आहे. Demand for ST stop at Aabaloli and Shringartali

Demand for ST stop at Aabaloli and Shringartali

गुहागर तालुक्यातील बहुतांश सर्वच गावे ही या बाजारपेठांवर अवलंबून आहेत. नेहमी हजारो लोकं या दोन शहरात विविध कामांसाठी ये-जा करत असतात. तरी देखील या दोन्ही ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पीकअप शेडची सुविधा नसल्याने ग्रामस्थांना भर उन्हात व पावसात तासंनतास उभं राहून बसची प्रतिक्षा करावी लागते. शेड नसल्याने रस्त्यावर गर्दी होते. अपघातही होतात.

आबलोली एस.टी. स्टॅण्डवर कोणीतरी पत्रा टाकला आहे. पण त्यावर काही नमूद नसल्याने ती जागा दुकानदाराची की सरकारी यावर लोकांचा संभ्रम आहे. त्यामुळे प्रवाशी उन्हात उभं राहणे पसंत करतात. तरी प्रशासनाने याबाबत लक्ष घालून आबलोली एसटी थांबा असं नमूद करावं. तसेच शृंगारतळी बाजारपेठतील प्रश्नहि ताबडतोब सोडवावा, अशी आग्रही मागणी गणेश कदम यांनी केली आहे. Demand for ST stop at Aabaloli and Shringartali

Tags: Demand for ST stop at Aabaloli and ShringartaliGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share183SendTweet114
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.