वरवेली तेलीवाडी, साकवाची अनेक वर्षांची मागणी दुर्लक्षित
गणेश किर्वे, माजी ग्रामपंचायत सदस्य, वरवेली
गुहागर, ता. 13 : पावसाळ्यात नदी नाले दुथडी भरुन वाहु लागले की वरवेली तेलीवाडीतील एखाद्याचा मृत्यू ही ग्रामस्थांसाठी डोकेदुखी ठरते. शासकीय स्मशानभुमीपर्यंतचा प्रवास नाल्यातून करावा लागतो. या नाल्यावर साकव बांधण्याची मागणी येथील ग्रामस्थ अनेक वर्ष करत आहेत. परंतू तांत्रिक कारणांमुळे प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. Demand for Sakwa in Varveli ignored
वरवेली तेलीवाडीचे स्मशान एका नाल्याच्या पलिकडे आहे. शासनाने लोकांच्या सोयीकरीता या ठिकाणी चौथरा, पत्र्याची शेड असा खर्चही केला आहे. दरवर्षी पावसाळ्याचे चार महिने या स्मशानभुमीपर्यंत अंत्ययात्रा घेवून जाण्यासाठी कसरत करावी लागते. नाल्याच्या वेगवान प्रवाहातून कंबरभर पाण्यातून पलीकडे जावे लागते. मुसळधार पाऊस असेल, नाल्याचा प्रवाह धोकादायक असेल तर काही वेळा अंत्ययात्रेसाठी पाऊस कमी होण्याची आणि पाणी ओसरण्याची वाट पहावी लागते. अशावेळी वाडीतील व्यवहार ठप्प होतात. मृत व्यक्तींच्या कुटुंबियांसह ग्रामस्थांचा खोळंबा होतो. त्यामुळे पावसाळ्यात मृत्यू नको रे बाबा असे म्हणण्याची वेळ या ग्रामस्थांवर आली आहे. Demand for Sakwa in Varveli ignored
पावसाळ्यात धोकादायक नाला पार करावा लागू नये. तसेच पावसानंतरही नाल्यातील दगड धोंड्यातून जाण्याचा त्रास वाचावा. म्हणून कायमस्वरुपी साकव, छोटा पूल बांधावा. अशी मागणी येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्ष करत आहेत. मात्र स्मशानभुमीकडे जाणाऱ्या पायवाटेची नोंद ग्रामपंचायतीच्या दफ्तरात नाही. ही पायवाट खासगी जागेतून आहे. तसेच हा नाला बारमाही वाहत नाही. जुन, जुलैमधील पावसाचा भर ओसरला की नाला सहज पार करता येतो. त्यामुळे शासन अनेक वर्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. Demand for Sakwa in Varveli ignored
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात आपण आलो तरी ग्रामीण भागातील जनतेला मुलभूत सोयीसुविधां करीता झगडावे लागते. स्मशानभुमीच्या जागेवर शासनाचा अधिकार आहे. दुसऱ्या बाजुला साकव किंवा पुलावर चढण्यासाठी आवश्यक जागा देण्यास मालक तयार आहे. तरीही ही मागणी पूर्ण होत नाही. हे दुर्दैव आहे. Demand for Sakwa in Varveli ignored