पांडुरंग पाते ; जातनिहाय जनगणनेची मागणी कायम
गुहागर, ता. 24 : राजकिय आरक्षणाच्या लढ्यात सर्व ओबीसी बांधवांच्या संघटीत सहकार्याने आपण यशस्वी झालो. प्रामाणिक आत्मीयतेने संविधानिक लढा देणाऱ्या सर्व संबंधित राजकिय पक्षांचे आपणास सहकार्य लाभले. त्यामुळे या यशाचे श्रेय व्यक्तीगत नसून सामुदायिक आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. आणि आमची ती कायम मागणी असेल, असे प्रतिपादन गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांनी केले आहे. Demand for caste wise census
केवळ ढोबळ माहितीच्या आधारे यश प्राप्त होऊ शकते. तर मग ओबीसींची जनगणना झाली तर जातनिहाय संख्या आणि नोकरी, शिक्षण, आर्थिक इ. बाबतची प्रत्यक्षात वास्तवता बांठीया आयोगाला सर्वोच्च न्यायालयात मांडता आली असती. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणातील आमुलाग्र बदल दिसला असता असेही मत पांडुरंग पाते यांनी मांडले. Demand for caste wise census
गुहागर तालुक्यात सर्व ओबीसी समाज घटकांनी या लढ्यामध्ये आपले योगदान देऊन राज्य व जिल्हा नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार कार्य केले. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच जातनिहाय जनगणनेसाठी हा लढा असाच अविरतपणे सुरू राहील असेही सांगितले. तालुका-जिल्हा स्तरावर सल्लागारांसहित गुहागर तालुका समिती व सर्व जिल्हा परिषद गटांच्या उपसमित्यांचे पदाधिकारी, तळागाळातील सर्व शिलेदारांनी आणि पत्रकार मित्रांनी कसलीही तमा न बाळगता ओबीसी चळवळीप्रती आपली प्रामाणिक भूमिका पार पाडली. त्याचीच हि फलश्रूती आहे. त्याबद्दल ओबीसी संघर्ष संबंधित समिती कार्यकारिणीच्या वतीने अध्यक्ष पांडुरंग पाते, सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी सर्वांचे अभिनंदनासह आभार मानले आहेत. Demand for caste wise census