• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

घरगुती सिलिंडरच्या सबसिडीबाबत मोठा निर्णय

by Mayuresh Patnakar
September 22, 2026
in Maharashtra
191 2
6
Decision on subsidy on domestic cylinders
375
SHARES
1.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

१ ऑक्टोबरपासून इकेवायसी अत्यावश्यक होणार

नवी दिल्ली, ता. 22 : केंद्र सरकारचा घरगुती एलपीजी सिलिंडरवर सबसिडीचा लाभ घेण्यासाठी एक ऑक्टोबरपासून आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण करणे आवश्यक असेल. सबसिडीचा लाभ केवळ पात्र ग्राहकांनाच मिळावा आणि बनावट किंवा डुप्लिकेट कनेक्शनद्वारे याचा गैरवापर होऊ नये, हे सुनिश्चित करणे हा सरकारचा उद्देश आहे. Decision on subsidy on domestic cylinders

ज्या ग्राहकांनी आधीच आधार बायोमेट्रिक पडताळणी किंवा ई-केवायसी (e-KYC) केले आहे, त्यांना पुन्हा प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता नसेल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानुसार, 19 सप्टेंबरपर्यंत 27.43 कोटी सक्रिय घरगुती एलपीजी ग्राहक म्हणजेच सुमारे 89.9 टक्के ग्राहकांची आधार बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण झाली होती. सरकारने यापूर्वी यासाठी 30 जूनची मुदत निश्चित केली होती, ती नंतर वाढवून 14 सप्टेंबर करण्यात आली. सप्टेंबर 2026 मध्ये 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरवर सुमारे 210 रुपयांची अप्रत्यक्ष सबसिडी मिळत आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, ज्या ग्राहकांनी आतापर्यंत पडताळणी केलेली नाही, ते ती पूर्ण केल्यानंतर सबसिडीच्या सिलिंडरचे बुकिंग करू शकतील. Decision on subsidy on domestic cylinders

ग्राहक एलपीजी वितरकाच्या (डिस्ट्रीब्यूटरच्या) शोरूमवर किंवा सिलिंडरच्या डिलिव्हरीच्या वेळी डिलिव्हरी कर्मचाऱ्याच्या मोबाईल ॲपद्वारे आधार बायोमेट्रिक पडताळणी करू शकतात. तेल कंपन्यांच्या मोबाईल ॲपवरूनही ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण न करणाऱ्या ग्राहकांना एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद होणार नाही, परंतु त्यांना सबसिडीचा लाभ मिळणार नाही. अशा ग्राहकांना सिलिंडर बाजारातील किमतीत (मार्केट रेटवर) घ्यावा लागेल. Decision on subsidy on domestic cylinders

Tags: Decision on subsidy on domestic cylindersGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share150SendTweet94
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.