महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा; ५० लोकांना उष्माघाताची समस्या जाणावली
मुंबई, ता. 17 : ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले होते. कार्यक्रमानंतर पुरस्कार सोहळ्यात आलेल्या अनेक अनुयायांना उष्माघाताची समस्या जाणवली. काहीजण चक्कर येऊन पडले, तर अनेकांना उलटी झाली. या उष्माघातामुळे 11 श्री सदस्यांचा मृत्यू झाला. Death of Shree Members due to heat stroke

रुग्णालयात दाखल असलेल्या अनुयायांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेत चौकशी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, ५० लोकांना उष्माघाताची समस्या जाणावली होती. त्यात 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, काही जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत सरकारतर्फे केली जाणार आहे. अनुयायांवर चांगले उपचार देण्याच्या सूचना डॉक्टरांना दिल्या आहेत, अशी माहितीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे. Death of Shree Members due to heat stroke
एमजीएम रुग्णालयामध्ये काही जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. ही घटना दुर्दैवी, दुख:द आणि मनाला वेदना देणारी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये सरकारी मदत दिली जाईल आणि उपचार घेत असलेल्यांचा खर्च शासन करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. २४ जणांवर उपचार सुरू आहेत. ५० जण ऍडमिट होते. जवळपास सगळे स्टेबल आहेत’, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. Death of Shree Members due to heat stroke
