आबलोलीतील घटना, विजापूरातील कामगार
गुहागर, ता. 14 : हातातील लोखंडी सळी वीजवाहिनीला लागल्याने आबलोलीत एका प्रौढाचा जागीत मृत्यू झाला आहे. सदर प्रौढाचे नाव रवी राठोड (वय 40) असून तो कर्नाटक राज्यातील विजापूर येथे रहाणार आहे. ही घटना सोमवारी (ता. 13 मार्च) सकाळी 9.30 च्या दरम्यान घडली. Death of an adult due to electric shock

याबाबत गुहागर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातील विजापूरला रहाणारे दोनजण रवी रामु राठोड आणि स्वप्नील देसु राठोड हे सध्या आपल्या काही सहकाऱ्यांसह गुहागर तालुक्यातील आबलोली येथे काम करत आहेत. रवी आणि स्वप्नील सोमवारी (ता. 13 मार्च) सकाळी आबलोली पेट्रोल पंपाजवळील गटारावर काँक्रीटचा स्लॅब ओतण्यासाठी स्टीलची जाळी बनविण्याचे काम करत होते. ही स्टिलची जाळी बनविण्यासाठी योग्य मापात लोखंडी सळ्यात तोडण्याचे काम सुरु होते. यावेळी रवीच्या हातातील सळी गटाराजवळून गेलेल्या वीजवाहिनीतील तारेला चिकटली. विद्यूत प्रवाह सुर असल्याने सळी तारेला चिकटाच क्षणी रवी राठोडच्या शरीरात वीज प्रवाहीत झाली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. लगेचच स्वप्नील राठोड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रवी राठोडला आबलोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रवीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. Death of an adult due to electric shock
या घटनेची माहिती स्वप्नील देसु राठोड यांनी गुहागर पोलीस ठाण्यात दिली, असून अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत. दरम्यान शवविच्छेदनानंतर रवी राठोड यांचा मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. Death of an adult due to electric shock
