• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
31 May 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

लाडकी बहीण योजनेत सरकारला चुना लावला

by Guhagar News
September 4, 2024
in Bharat
212 3
10
Dear sister scheme
417
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पत्नीच्या नावे ३० फॉर्म भरले, २६ अर्जांचे पैसे बँक खात्यात जमाही झाले

गुहागर, ता. 04 : राज्य सरकारनं महाराष्ट्रातील पात्र महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये दिले जातात. या योजनेचा राज्यातील कोट्यवधी महिलांनी लाभ घेतला आहे. एकाच महिलेच्या नावे ३० वेगवेगळे अर्ज, वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करुन एकाच मोबाईल क्रमांकाचा वापर करत मिळणारी रक्कम लुटल्याचा प्रकार घडला आहे. Dear sister scheme

खारघर येथील महामुनी यांचा अर्ज वारंवार भरून देखील सबमिट होत नसल्याने त्यांनी भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांच्याकडे तक्रार केली. यानंतर निलेश बाविस्कर यांनी शोध घेतला असता पुजा महामुनी यांचा अर्ज आधीच अप्रूव्हड झाला असल्याचे समोर आले. मात्र, त्यांच्या आधारकार्डला सातारा येथील जाधव नामक व्यक्तीचा मोबाईल नंबर ॲड झाला होता. याबाबत अधिक माहिती मिळवली असता या व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावे एक नव्हे तब्बल ३० अर्ज भरल्याचे दिसून आले. यानंतर सदरची तक्रार पनवेल तहसिलदारांकडे करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. Dear sister scheme

खारघर येथील रहिवासी असलेल्या पूजा महामुनी यांचा अर्ज दुसऱ्या मोबाइल क्रमांकावरुन दाखल करुन मजूंर करण्यात आल्याचं निदर्शनास आलं आहे. महामुनी यांनी पनवेल मधील भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांना अर्ज दाखल करण्यासाठी २८ ऑगस्ट रोजी मदत मागितली. २९ ऑगस्टला महामुनी यांनी मोबाईल नंबर नोंदवून लॉगीन करण्याचा प्रयत्न केला असता लाडकी बहीण योजनेचा अर्ज दाखल आणि मंजूर करण्यात आल्याची माहिती दाखवण्यात आली, यामुळं हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. Dear sister scheme

निलेश बाविस्कर यांनी यानंतर अधिक चौकशी करुन त्या मेसेजमध्ये मिळालेल्या फोन नंबरवर फोन केला असता संबंधित व्यक्तीनं तो सातारा येथील असल्याचं सांगितलं. संबंधित व्यक्तीला निलेश बाविस्कर यांनी ओटीपी शेअर करायला सांगितला, त्या व्यक्तीनं तो दिला देखील त्यानंतर निलेश बाविस्कर यांनी सामाजिक कार्यकर्त्या कांचन बिर्ला यांच्या मदतीनं माहिती घेतली असता ३० लाभार्थी महिलांची खाती एकाच मोबाईल नंबरला लिंक करण्यात आल्याचं समोर आलं. त्या पैकी २७ लाभार्थ्यांचं नाव एक सारखं होतं मात्र आधार कार्ड नंबर वेगवेगळे होते. यापैकी २६ अर्ज मंजूर झाले असून चार अर्ज मंजूर झालेले नाहीत. यामुळं महामुनी, बिर्ला आणि बाविस्कर यांनी पनवेल तहसिलदारांकडे तक्रार दिली. संबंधित व्यक्तीनं पासवर्ड देखील बदलले असल्याचं समोर आलं आहे. Dear sister scheme

Tags: Dear sister schemeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share167SendTweet104
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.