विजेत्या भारतीय संघाचा सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयातर्फे सत्कार
दिल्ली, ता. 02 : दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांनी भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघटनेने (आयडीसीए) तीन देशांतील कर्णबधिर क्रिकेटपटूंसाठी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघाचा सत्कार केला. भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाने बांगलादेश कर्णबधिर संघाचा विक्रमी 166 धावांनी पराभव करून यंदाची ही स्पर्धा जिंकली. Deaf cricket tournament concluded in Kolkata
नवी दिल्ली येथे सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये या विभागाच्या पंडित दीनदयाल अंत्योदय कॉन्फरन्स हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. ही आंतरराष्ट्रीय स्पर्धा 29 एप्रिल ते 5 मे दरम्यान कोलकाता येथे मर्लिन राइज, स्पोर्ट्स सिटी, क्लब पॅव्हेलियन क्रिकेट मैदान, राजारहाट या ठिकाणी झाली. Deaf cricket tournament concluded in Kolkata
भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, सदस्य, खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल राजेश अग्रवाल यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी संघातील प्रत्येक खेळाडूची पार्श्वभूमी, त्याची रोजगार स्थिती अशी माहिती जाणून घेण्यासाठी संवाद साधला. कतार येथे होणाऱ्या आससीसी डेफ एकदिवसीय विश्वचषकासाठी निवड झालेल्या संघातील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. Deaf cricket tournament concluded in Kolkata
भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघटनेच्या पॅट्रन रीना जैन मल्होत्रा यांनी संस्थेबद्दल सविस्तर माहिती दिली. 2020 मध्ये आयडीसीएची स्थापना झाली. सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत ही नोंदणीकृत संस्था आहे. देशातील कर्णबधिर खेळाडूंमध्ये क्रिकेट खेळाचा प्रचार करणे आणि त्यांना गुणवत्ता दाखवता यावी यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आयडीसीएचे एकमेव उद्दिष्ट आहे. खेळाडूंना त्यांच्या संबंधित राज्यांचे राष्ट्रीय स्तरावर आणि देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करता यावे. यासाठी आयडीसीए कार्यरत आहे. इंडियन डेफ क्रिकेट असोसिएशन (आयडीसीए) ही भारतातील कर्णबधिर क्रिकेटसाठीची एक प्रशासकीय संस्था आहे आणि डीआयसीसी (डेफ इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल) ची सदस्य आहे. ही संस्था जागतिक स्तरावर कर्णबधिर क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)च्या खांद्याला खांदा लावून काम करते. Deaf cricket tournament concluded in Kolkata