• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संगमेश्वर येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा

by Manoj Bavdhankar
May 20, 2024
in Ratnagiri
136 2
1
संगमेश्वर येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा
267
SHARES
764
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 20 : संगमेश्वर तालुक्यातील डिंगणी चाळकेवाडी या ठिकाणी दि. १७ मे रोजी सकळी ८ वाजता रस्त्यालगत वन्यप्राणी बिबट्याचा बछडा हा मृत अवस्थेत पडला असल्याबाबत पोलीस पाटील, डिंगणी यांनी दूरध्वनीव्दारे वनविभागास कळविले. माहितीच्या अनुषंगाने वनपाल, संगमेश्वर यांनी रेस्क्यू टिमसह घटनास्थाळी जाऊन पाहाणी केली आहे. Dead leopard found in Sangameshwar

वनक्षेत्रपालांनी पंचासमवेत घटनास्थळी जावून पंचनामा केला. बिबटया हा अंदाजे तीन ते चार महिने वयाचा मादी प्रजातीचा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मानेवर दाताच्या खोल खुणा दिसून आल्या व त्या जखमेतून रक्तमिश्रीत पाणी वहात असल्याचेदेखील दिसून आले. पायाच्या वरील बाजूस जखम असल्याचे आढळले. मृत बछड्याच्या शरिराची मापे घेवून शव ताब्यात घेण्यात आले. पुढे पशुवैद्यकीय अधिकारी, देवरुखमार्फत शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याचा मृत्यू हा वन्यप्राण्याच्या हल्यात जखमी होवून झाल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे. वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांच्यामार्फत पंचासमक्ष मृत बिबट्यास त्याच ठिकाणी लाकडाची चिता रचून दहन करुन नष्ट करण्यात आले. Dead leopard found in Sangameshwar

बिबट्याच्या मृत्यूबाबतचा अधिक तपास विभागीय वन अधिकारी (चिपळूण) गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) अ.का. वैभव बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल  प्रकाश सुतार व त्यांचे अधिनस्त वनपाल संगमेश्वर, वनरक्षक, कडुकर व वनरक्षक कराडे हे करत आहेत. मानवी वस्तीमध्ये किंवा संकटात सापडलेले वन्यप्राणी आढळल्यास याबाबत तात्काळ माहिती देण्यासाठी वनविभागाचा टोल फ्रि क्र.१९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक वनसंरक्षक श्री. बोराटे यांनी केले आहे. Dead leopard found in Sangameshwar

Tags: Dead leopard found in SangameshwarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMaharashtraMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share107SendTweet67
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.