• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
2 August 2026, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

चिपळुण येथे भरदिवसा घरफोडी

by Mayuresh Patnakar
August 1, 2026
in Ratnagiri
140 2
0
Daylight burglary in Chiplun
275
SHARES
787
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सोन्याचे दागिने व रोकडसह ८.१८ लाखांचा ऐवज लंपास

गुहागर, ता. 01 : चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरातील अल नजु अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे ८ लाख १८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. Daylight burglary in Chiplun

गोवळकोट रोड येथील अल नजु अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या नगमा अबीदअली मुजावर (वय ४०) या ३० जुलै रोजी दुपारी १२.३० ते १.४० या कालावधीत घराबाहेर गेल्या होत्या. याचवेळी अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. Daylight burglary in Chiplun

चोरीस गेलेल्या ऐवजात विविध सोन्याची मंगळसूत्रे, चेन, नेकलेस, कर्णफुले, अंगठ्या तसेच ८ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ८ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, याच कालावधीत चिपळूण बायपास रोडवरील द्वारका कृष्णकुंज इमारतीतील धनश्री भोसले यांच्या घरातही चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोन्ही घटनांमध्ये एकाच टोळीचा सहभाग आहे का, या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम ३०५(अ) आणि ३३१(३) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. Daylight burglary in Chiplun

Tags: Daylight burglary in ChiplunGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share110SendTweet69
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.